अशी निवडणूक जिथं एक पॅनल प्रमुख पडला, एक पडता पडता राहीला, एकाची बायको पडली, एका मतानं उमेदवार पडला

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरीच्या ग्रामपंयातीच्या निकालाकडे फक्त तालुकाच नाही तर जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.

अशी निवडणूक जिथं एक पॅनल प्रमुख पडला, एक पडता पडता राहीला, एकाची बायको पडली, एका मतानं उमेदवार पडला

परभणी : गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरीच्या ग्रामपंयातीच्या निकालाकडे फक्त तालुकाच (Pimpaldari Gram Panchayat Election Result) नाही तर जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. कारण पिंपळदरीत आ. रत्नाकर गुट्टे यांच्या मित्रमंडळाचे तालुका प्रभारी हनुमंत मुंढे यांचा पॅनल उभा होता. त्यांच्याविरोधात भाजपा नेते भाई ज्ञानोबा मुंढे यांच्या पॅनलनं तगडं आव्हान उभं केलं. म्हणजे रासपा विरूद्ध भाजपा अशी थेट लढत झाली. या लढतीत हनुमंत मुंढे यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव झाला. पंडीत मुंढे गुरुजी यांच्या पॅनलचा 8 – 3 असा विजय झाला (Pimpaldari Gram Panchayat Election Result).

दोन्ही पॅनलना जनतेचा झटका!

हनुमंत मुंढे यांची आई या गेल्या पाच वर्षे पिंपळदरीच्या सरपंच होत्या. स्वत: हनुमंत मुंढे हे गेल्या पंधरा वर्षापासून सदस्य म्हणून निवडुण येत होते.  पण यावेळेस जनतेनं त्यांना धडा शिकवत फक्त 3 जागा त्यांच्या पदरात दिल्या. गुरूजींच्या पॅनलनं 8 जागा जिंकल्या. यात खुद्द हनुमंत मुंढे यांचा नवख्या सुधाकर मुंढे यांनी दणदणीत पराभव केला तर पॅनल प्रमुख असलेल्या पंडीतराव मुंढे गुरूजी यांचाही निसटता विजय झाला. नवख्या यादव महात्मेंनी चांगली टक्कर दिली. त्याच वॉर्डात हनुमंत मुंढे पॅनलच्या सुवर्णमाला चाटे यांचा एका मताने पराभव झाला. सरोजा मुंढे विजयी झाल्या.

बायको पडली, आई जिंकली!

पिंपळदरीत वॉर्ड क्रमांक 4 मध्ये हनुमंत मुंढे यांच्या आई आणि माजी सरपंच रुक्मिनबाई मुंढे यांच्या विरोधात गुरूजींच्या पत्नी रेखा मुंढे ह्या रिंगणात होत्या. त्यात रुक्मिनबाई मुंढे यांचा विजय झाला. म्हणजेच गुरुजी स्वत: निवडुण आले पण त्यांच्या पत्नीचा पराभव झाला तर हनुमंत मुंढे स्वत: पडले आणि त्यांची आई निवडुण आली.

Pimpaldari Gram Panchayat Election Result

संबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एमबीए शिकलेला तरुण बनला ग्रामपंचायत सदस्य; गावात घडवलं सत्तांतर

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

मुक्ताईनगरात ग्रामपंचायती 51, सेना-राष्ट्रवादी-भाजपच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे टोटल 90 वर

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI