AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: अंबरनाथमध्ये गॅस गळती, 18 ते 20 जण गुदमरले; उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल

अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत आज सकाळी गॅस गळती झाली. आरके केमिकल्स कंपनीत ही गॅस गळती झाली असून त्यामुळे 18 ते 20 जण गुदमरले आहेत. (Gas leak in Ambernath MIDC, over 20 people affected)

VIDEO: अंबरनाथमध्ये गॅस गळती, 18 ते 20 जण गुदमरले; उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल
Ambernath MIDC
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 1:42 PM
Share

अंबरनाथ: अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत आज सकाळी गॅस गळती झाली. आरके केमिकल्स कंपनीत ही गॅस गळती झाली असून त्यामुळे 18 ते 20 जण गुदमरले आहेत. या सर्वांना उल्हानगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं.

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत आर. के. केमिकल्स नावाची कंपनी असून त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते. कंपनीत आज सकाळी नेहमीप्रमाणे डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना 10 वाजताच्या सुमारास अचानक प्लँटमधला एक पाईप निसटला आणि त्यातून हवेत गॅस पसरला. हा गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत घुसला. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या 18 ते 20 कामगारांना उलट्या, मळमळ, गुदमरणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कर्मचाऱ्यांनी केमिकलचा आम्हाला मोठा त्रास झाल्याचं सांगितलं.

एकच घबराट

दरम्यान, ही गॅस गळती झाल्याने अचानक कामगारांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली. काही जणांना चक्करही आली. त्यामुळे कंपनीत एकच धावपळ उडाली. अनेकांनी तात्काळ कंपनीच्या बाहेर धाव घेऊन मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न केला. तर कंपनीत गॅस गळती झाल्याची वार्ता अंबरनाथमध्ये पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

निष्काळजीपणामुळे गॅस गळती

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल, शिवाजीनगर पोलीस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कंपनीच्याच निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची कबुली कंपन्यांची संघटना असलेल्या अॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली. तर या कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.

संबंधित बातम्या:

ठाणे-पालघरमध्ये 4 दिवसांत सव्वा सात हजार बाटल्या रक्तसंकलन; अभिनेते शरद पोंक्षेंकडूनही शुभेच्छा

ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेची संयुक्त रॅली, महाराष्ट्र बंदची हाक, दिग्गजांचा सहभाग

VIDEO: मावळमध्ये नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर पलटवार

(Gas leak in Ambernath MIDC, over 20 people affected)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.