AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मावळमध्ये नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर पलटवार

मावळच्या गोळीबारावेळी जालियनवाला बाग आठवलं नाही का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आघाडी सरकारला केला आहे. (jitendra awhad reply bjp over maval firing)

VIDEO: मावळमध्ये नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर पलटवार
jitendra awhad
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 6:05 PM
Share

ठाणे: मावळच्या गोळीबारावेळी जालियनवाला बाग आठवलं नाही का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आघाडी सरकारला केला आहे. भाजप नेत्यांच्या या प्रश्नावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. चौकशीत या गोळीबाराची गरज असल्याचं न्यायाधीशांनी मान्य केलं आहे. मावळमध्ये कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला. मावळची दुर्घटना घडली. त्याची चौकशी केली. तो गोळीबार कसा गरजेचा होता हे न्यायाधीशांनी मान्य केलं. तुम्हाला संधी दिली होती ना तेव्हा. तुम्ही विरोधी पक्षात होता ना. त्यामुळे मावळचं उदाहरण आणि हे उदाहरण देऊ नका. मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. पोलिसांच्या हातातून बंदुका घेऊन कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता. इथे या देशाच्या गृहराज्यमंत्र्याचा पोरगा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून चक्क गाडी घेऊन जातो. मावळचा गोळीबार हा पोलिसांचा होता. पोलीस आणि सामान्य जनतेत काही फरक आहे की नाही?, असा सवाल आव्हाड यांनी केला.

तुम्ही खाता तो गहू उत्तर प्रदेशातून येतो

अमानवी कृत्याचं दुख होणं हे माणुसकीचं लक्षण आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज हा त्या घटनेतून दिसून येतो. गोरगरीब शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. पाठिमागून जीप आणून अंगावर घालायची आणि नऊ जणांना चिरडून मारायचे यांच्याबद्दल वाईट वाटणारच नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेतकरी कुठलाही असो शेवटी तो या देशाचा शेतकरी आहे ना? देशासाठी अन्न पिकवतो ना? उत्तर प्रदेशातील ज्या भागात ही घटना घडली. त्या भागात सर्वाधिक गहू उगतो. तुमच्या घरातील पोळ्या या तिथूनच आलेल्या गव्हाच्या बनवल्या जातात. तेव्हा खाताना बरं वाटत ना? मग चिरडतानाचं दु:ख दाखववायचं की नाही? तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच या सर्वातून दिसून येतं, अशी टीका त्यांनी केली.

तर फडणवीसांची माणूसकी दिसली असती

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात आहेत. सत्ताधाऱ्यांनी बंद केला आहे. त्यामुळे ते बोलणारच. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शेवटी ते विरोधक आहेत. पण जे चिरडून मारले गेले त्यांच्याबद्दल संवेदना दाखवल्या असत्या तर त्यांच्यातली माणुसकी दिसली असती. जिवंतपणा दिसला असता. सर्वच गोष्टीत राजकारण करावं असं काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

क्या गरीब की जान, जान नही होती सेठ…

मला जुन्या चित्रपटाचा एक संवाद आटवतो. क्या गरीब की जान, जान नही होती सेठ… श्रीमंताना काही झाले की आम्हाला वाईट वाटणार आणि गरीबांबाबत काहीच वाटणार नाही. बंदबाबत विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्यात. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत देशातील जनतेला चिंता आहे. हा महात्मा गांधींचा देश आहे. त्यामुळे नथुरामाच्या चिल्यापिल्यांना काय वाटते याच्याशी आपला संबंध नाही. हा कार्यकर्त्यांचा बंद आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात

सुप्रियाताईंचा सूर आणि दिशादर्शन चुकीचं; संजय राऊतांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, शेलारांची टोलेबाजी

रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट, बंद पाळून नागरिकांची भाजपला सणसणीत चपराक : नाना पटोले

(jitendra awhad reply bjp over maval firing)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.