अमरावतीत “घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा” अभियान, बग्गी गावच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सरपंचांकडून करवसुली

अमरावतीतील बग्गी गावातील इतिहासात पहिल्यांदाच महिला सरपंच (Tax Recovery Campaign By Baggi Sarpanch) करवसुलीला निघाल्या आहेत.

अमरावतीत "घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा" अभियान, बग्गी गावच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सरपंचांकडून करवसुली
Baggi sarpanch

अमरावती : अमरावतीतील बग्गी गावातील इतिहासात पहिल्यांदाच महिला सरपंच करवसुलीला (Tax Recovery Campaign By Baggi Sarpanch) निघाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात “घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा” अभियान राबवलं जात आहे (Ghar Tax Bhara Gram Samruddha Kara Tax Recovery Campaign By Baggi Sarpanch Vijaya Chawale).

सरपंचपदाचा पदभार स्विकारताच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी गावच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सरपंचा विजया प्रकाश चवाळे या कर वसुलीसाठी घरोघरी फिरत आहेत. त्या “घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा” हे अभियान राबवित आहे. याला गावकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद सुध्दा मिळत असल्याचे चित्र आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंचा विजयाताई प्रकाश चवाळे यांनी पदभार स्वीकारताच “घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा” हे अभियान हाती घेतले. ग्रामस्थांकडून थकीत सामान्यकर आणि पाणीपट्टी कर घरोघरी जाऊन संकल्पना समजावून सांगत टॅक्स वसूल करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बग्गीच्या इतिहासात पहिल्यांदा सरपंच बाई कर वसुली करण्यासाठी पुढे आल्या असल्याने गावकऱ्यांचे सहकार्य सुद्धा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तर येत्या 31 मार्चपर्यंत गावात शंभर टक्के कर वसुली करण्याचा निर्धार आहे. “ग्रामविकासाची धरु कास आणि बग्गी गावचा करु विकास” या नाऱ्याप्रमाणे काम करेल आणि गावाचा विकास करेल, असे बग्गी गावच्या नवनिर्वाचित सरपंचा विजया प्रकाश चवाळे यांनी म्हटले.

ठाण्यात 21 वर्षांची मुलगी सरपंटपदी

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका बारकु आगिवले या तरुणीची निवड झाली आहे. सारिका ही अवघ्या 21 वर्षांची आहे. त्यामुळे तिने राज्यातील सर्वात लहान सरपंचांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळवला आहे. सारिकाची सरपंचपदी निवड झाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण आहे.

सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सारिकानेही आनंद व्यक्त केला. मी माझ्या शिक्षणाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करेन, अशी प्रतिक्रिया सारिका आगिलवे हिने दिली.

माढ्याच्या सुलतानपूरमध्ये 21 वर्षी रोहन धुमाळ सरपंचपदी

राजकारणात आजची तरुणाई सहभागी होत असल्याचं ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले होते. गावोगावच्या तरुणांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सुलतानपूरच्या रोहन हनुमंत धुमाळ या 21 वर्षीय तरुणानं तरुणाने ग्रामपंचायतीचे मैदान मारत गावचे सरपंच पद देखील पटकावले आहे. वयाच्या 21 व्या वर्षी गावचे सरपंचपद काबीज केल्याने रोहन सर्वात कमी वयाचा सरपंच म्हणून सोलापूर जिल्ह्यात चर्चेला आलाय.

Ghar Tax Bhara Gram Samruddha Kara Tax Recovery Campaign By Baggi Sarpanch Vijaya Chawale

संबंधित बातम्या :

माढ्याच्या सुलतानपूरमध्ये 21 वर्षी रोहन धुमाळच्या गळ्यात सरपंचपदाची माळ

राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार : नारायण राणे

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI