AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उमेद अभियान’मुळे सामान्य महिलांचं उद्योजिका बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार!

उमेद अभियान आणि एसबीआय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने "घे भरारी - मला पंख मिळाले" हा टीव्ही शो सुरू होत आहे. हा शो ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. ३९ महिलांच्या यशोगाथा या शोमध्ये दाखवल्या जाणार आहेत, ज्या लाखो महिलांना प्रेरणा देतील. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणार भांडवल, निधी हे एसबीआय फाऊंडेशनतर्फे मिळणार आहे. 13 डिसेंबरपासून हा शो टीव्ही9 वर डिसेंबरपासून प्रसारित होईल.

'उमेद अभियान'मुळे सामान्य महिलांचं उद्योजिका बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार!
'उमेद अभियान'मुळे स्त्रियांच्या स्वप्नांना आता मिळणार बळImage Credit source: tv9
| Updated on: Dec 13, 2024 | 8:24 AM
Share

‘उमेद अभियान आणि एसबीआय फाऊंडेशन’मुळे स्त्रियांच्या स्वप्नांना आता बळ मिळणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘उमेद अभियान’ने महिला स्वयंसहायता समूहातील महिला उद्योजकांसाठी ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ हा नवा कोरा टीव्ही शो आणला आहे. 13 डिसेंबर 2024, संध्या. 4.15 वाजता TV9 या लोकप्रिय चॅनेलवर हा शो दाखवला जाणार आहे. स्त्रियांचं आयुष्य म्हटलं तर संसार, चूल, मूल यांसारख्या असंख्य गोष्टी सांभाळण्यात जातं. पण सध्याच्या बदलत्या काळात स्त्री संसार सांभाळून स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहिलेली पाहायला मिळत आहे. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. पण तरीही स्त्रीला प्रोत्सहन, योग्य मार्गदर्शन मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी ‘उमेद अभियान’ स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी घेऊन येत आहे ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ हा नवा कोरा कार्यक्रम.

70 लाख महिलांना मिळणार प्रेरणा

अनेकदा महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्सहन दिलं जातं. पण ‘उमेद अभियान’मधून ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ या कार्यक्रमातून तब्बल 70 लाख महिलांना प्रेरणा मिळणार आहे. ‘उमेद अभियानने’ या अनोख्या कार्यक्रमासाठी 39 महिलांची निवड केली आहे. या महिलांची यशोगाथा ऐकून इतर महिला प्रोत्साहीत होतील. त्यांनाही त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. यावेळी महाराष्ट्रातील उद्योजिका अनघा घैसास आणि उद्योजक विशाल सोलासकर, राहुल पापल यांचं मार्गदर्शन महिलांना मिळणार आहे. यामध्ये महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणार भांडवल, निधी हे एसबीआय फाऊंडेशनतर्फे मिळणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व एसबीआय फाऊंडेशनने घेतल्यामुळे हा नाविन्यपूर्ण शो महाराष्ट्राला आणि देशाला अनुभवायला मिळणार आहे. 13 डिसेंबर 2024 पासून प्रत्येक शुक्रवार ते रविवारपर्यंत संध्याकाळी 4.15 वाजता फक्त टीव्ही9 मराठी चॅनलवर हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे.

ग्रामीण अर्थशास्त्राचा पाया मजबूत होणार

महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानचे मुख्य अधिकारी रुचेश जयवंशी या अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. “प्रत्येक ग्रामीण महिलेला तिची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल 70 लाख महिलांपर्यंत पोहचण्याच आमचं ध्येय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला उद्योजिका बनली पाहिजे. बदलत्या काळानुसार महिलांनी आणखी पुढे यायला हवं आणि त्यासाठीच ‘उमेद अभियान’ हे अभियान राबवत आहोत. या कार्यक्रमाचा परिणाम हा राज्याच्या ग्रामीण अर्थशास्त्राचा पाया मजबूत करण्यासाठी होणार आहे. अनेक महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा या कार्यक्रमातून मिळणार आहे, ” असं रुचेश जयवंशी यांनी ‘घे भरारी’ या कार्यक्रमाबद्दल बोलताना सांगितलं.

त्या महिलांना मिळेल नवीन उमेद

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे. “स्त्रियांना प्रत्येक कठीण प्रसंगातून जावं लागत. मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन, प्रोत्सहन मिळत नाही. पण ‘उमेद अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन नक्की मिळेल. या कार्यक्रमातून 39 महिलांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे हा अनुभव मला प्रत्यक्ष त्या स्त्रियांसह संवाद साधून अनुभवता येणार आहे. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खचून जाणारा क्षण येतोच, पण आता प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नवी उमेद मिळेल. आता स्त्री फक्त चूल, मूल सांभाळणारी नसेल तर ती एक उद्योजिका ही असेल, असं सांगतानाच ‘उमेद अभियान’चं खूप कौतुक वाटतं आणि या अभियानाचा मला एक भाग होता येतंय या गोष्टीचा आनंद आहे. ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ या कार्यक्रमाद्वारे स्वबळावर उभ्या राहिलेल्या 39 महिलांशी संवाद साधण्यास आणि त्यांची यशोगाथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे,” असं अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाली.

...तेव्हा पार्थ पवारचं नाव येईल, दादांच्या राजीनाम्याची मागणी अन्...
...तेव्हा पार्थ पवारचं नाव येईल, दादांच्या राजीनाम्याची मागणी अन्....
मनसे, शिवसेनेसह काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट अन्... माजी आमदाराचा दावा
मनसे, शिवसेनेसह काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट अन्... माजी आमदाराचा दावा.
राणाजगजितसिंह पाटलांचे पत्र, सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला
राणाजगजितसिंह पाटलांचे पत्र, सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला.
अजितदादा मोठे नेते पण... बाळराजेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले...
अजितदादा मोठे नेते पण... बाळराजेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले....
मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईनं भाजपात प्रवेश करताच म्हटलं, RSS माझ्या..
मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईनं भाजपात प्रवेश करताच म्हटलं, RSS माझ्या...
शिवसेनेतून भाजपात इनकमिंग... शिंदे म्हणाले, आमच्या पदाधिकाऱ्यांना...
शिवसेनेतून भाजपात इनकमिंग... शिंदे म्हणाले, आमच्या पदाधिकाऱ्यांना....
रायगडमध्ये गोगावलेंचा तटकरेंना जोर का धक्का.. राजकीय समीकरणं बदलणार?
रायगडमध्ये गोगावलेंचा तटकरेंना जोर का धक्का.. राजकीय समीकरणं बदलणार?.
आमचा नाद नको... दंड थोपटले अन् अजित पवारांनाच कुणी दिलं थेट चॅलेंज?
आमचा नाद नको... दंड थोपटले अन् अजित पवारांनाच कुणी दिलं थेट चॅलेंज?.
भाजपात इनकमिंग सुरूच राहणार, साडेचार हजार शिवसैनिक कमळ घेणार हाती?
भाजपात इनकमिंग सुरूच राहणार, साडेचार हजार शिवसैनिक कमळ घेणार हाती?.
बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई कोण? कोणते गुन्हे दाखल?
बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई कोण? कोणते गुन्हे दाखल?.