AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं घेतली एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाली आरोपीला…

पुणे बलात्कार प्रकरणातील पीडितेनं विधान भवनात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं घेतली एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाली आरोपीला...
Eknath ShindeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 17, 2025 | 4:43 PM
Share

काही दिवसांपूर्वी पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला त्याच्याच गावातून अटक केली होती. दरम्यान या घटनेनंतर आरोपीच्या नातेवाईकांकडून वेगवेगळे दावे देखील करण्यात आले. आता या प्रकरणातील पीडित तरुणीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली आहे.

पुणे बलात्कार प्रकरणातील पीडितेनं विधान भवनात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी पीडित महिलेनं आपली व्यथा त्यांना सांगितली. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील यावेळी पीडित महिलेनं एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान पीडित महिलेची व्यथा ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीला न्यायासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली. राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचंही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेला सांगितलं. या भेटीनंतर पीडीत महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केली.

नेमकं काय आहे प्रकरण?   

पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती, पुण्यातील स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या तरुणीवर एकदा नाही तर दोनदा बलात्कार झाल्याचं वैद्यकीय अहवालामधून समोर आलं. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी त्यानंतर त्याच्याच गावातून अटक केलं. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. सध्या आरोपी कोठडीत असून, घटनेसंदर्भात तपास सुरू आहे. आज या घटनेतील पीडितनेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Follow Us
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?