AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींसाठी ठाकरेंची सर्वात मोठी मागणी, पुढच्या सहा महिन्यांचे…आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष!

उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली. त्यांनी केलेल्या लाडक्या बहिणींसंदर्भातील मागणीची सरकार दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशीही मागणी केली आहे.

Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींसाठी ठाकरेंची सर्वात मोठी मागणी, पुढच्या सहा महिन्यांचे...आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष!
uddhav thackeray
| Updated on: Oct 01, 2025 | 5:10 PM
Share

Uddhav Thackeray : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील इतरही भागांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक चक्क पाण्यामुळे संपून गेले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी आज (1 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी महत्त्वाची मागणी केली. तसेच सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. हातातून पीक गेलेले असताना त्यांच्याकडून कर्जवसुली केली जात आहे, हा प्रकार थांबवावा असेही यावेळी ठाकरे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना सरकारने लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ अगोदरच देऊन टाकावा. सरकारने निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने दोन ते तीन महिन्यांचे पैसे अगोदरच दिली होते, तसेच पैसे यावेळीदेखील द्यावेत. या पैशांतून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा स्थितीत आर्थिक मदत मिळेल, अशी मोठी मागणी ठाकरेंनी केली.

एकनाथ शिंदे यांनी केली टीका

उद्धव ठाकरे यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना लाडकी बहीण योजनेवर बोलण्याचा अधिकारच नाही. ही योजना आणली होती, तेव्हा त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता त्यांना या योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, आता ठाकरेंनी लाडक्या बहिणींसीठी केलेल्या मागणीची सरकार दखल घेणार का? लाडक्या बहिणींना पुढच्या काही महिन्यांचे पैसे अगोदरच दिले जाणार का? सोबतच ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्याचीही सरकार दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...