Gondia Accident | सालेधारणीत वीज पडून महिलेचा मृत्यू, आमगावात 3 गोठे जळाले, आगीत 6 बकऱ्या भस्मसात

आगीचे रूप पाहून घरचे लोकं बाहेर आले. त्यामुळं त्यांचे प्राण वाचू शकले. पण, बकऱ्यांचा बळी गेला. घरी असलेले धानही जळून भस्मसात झाले. शेतीची अवजारेही जळून खाक झाली. त्यामुळं नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Gondia Accident | सालेधारणीत वीज पडून महिलेचा मृत्यू, आमगावात 3 गोठे जळाले, आगीत 6 बकऱ्या भस्मसात
गोंदियात वीज पडून 3 गोठे जळाले
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 3:07 PM

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सालेधारणी येथे वीज पडून महिलाचा मृत्यू झाला. लीला योगराज हिडामे असं महिलेचं नाव आहे. त्या शेतात पेरणीसाठी गेल्या होत्या. तर दुसरीकडं, जिल्ह्यामधील आमगाव ( Amgaon) तालुक्यातील नंगपुरा येथे वीज कोसळली. यात शेतकरी दशरथ टेंभरे (Dashrath Tembhare) परिवारातील तीन भावंडांचे गोठे रात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाले. या तीन गोठ्यात 195 पोते धान, शेतीची अवजारे आणि 6 बकऱ्या या आगीत भस्मसात झालेत. या तिन्ही शेतकऱ्यांचे जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले. वेळीच सावध झाल्याने तेथे राहणाऱ्या लोकांचा जीव वाचविण्यात यश आले. मात्र त्याठिकाणी ठेवलेले सर्व साहित्य आणि कागदपत्र जळून नष्ट झाले. वेळीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत धान्य आणि जनावरे जळून गेली होती. दशरथ टेंभरे व हेमंत टेंभरे (Hemant Tembhare) यांनी शासनास नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

धान्यासह शेतीची अवजारे जळाली

गोंदिया जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातवरण आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीशा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर घातली होती. पण, पावसामुळं शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, पावसामुळं शेतीच्या कामाला वेग आला आहे. पण, वीज पडल्यामुळं तीन गोठ्यांचे नुकसान झाले. गोठे जळून खाक झाले. ही घटना आमगाव तालुक्यातील नंगपुरा येथे घडली. आगीचे रूप पाहून घरचे लोकं बाहेर आले. त्यामुळं त्यांचे प्राण वाचू शकले. पण, बकऱ्यांचा बळी गेला. घरी असलेले धानही जळून भस्मसात झाले. शेतीची अवजारेही जळून खाक झाली. त्यामुळं नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज पडून महिलेचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस येत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील साले धारणी पोस्ट डोंगरगाव डेपो येथे वीज पडली. यात लीला योगराज हिडामे यांचा जागीच मृत्यू झाला. शेतात पेरणी करण्याकरिता लीला गेल्या होत्या. बारा वाजता जोरदार पाऊस व विजेचा कडकडाट सुरू झाला. महिलेच्या बाजूला वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.