Vehicle Number Plate : भाऊ, दादा नंबरप्लेटची गाडी येणार गोत्यात, गोंदिया वाहतूक पोलिसांचा खास ड्राइव्ह

सावधान! गोंदिया जिल्ह्यात आता वाहनांवर दादा, भाऊ लिहिल्यास दीड हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो. गोंदियाच्या वाहतूक विभागाकडून यासाठी खास ड्राईव्ह घेण्यात आलाय. सायलेंसरवरही पोलिसांचं लक्ष असणार आहे.

Vehicle Number Plate : भाऊ, दादा नंबरप्लेटची गाडी येणार गोत्यात, गोंदिया वाहतूक पोलिसांचा खास ड्राइव्ह
भाऊ, दादा नंबरप्लेटची गाडी येणार गोत्यातImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 5:08 PM

गोंदिया : गोंदियासह (Gondia) राज्यात इतरही ठिकाणी लोक सर्रासपणे वाहनांच्या नंबर प्लेटवर (Vehicle Number Plate) प्रेस, भाऊ, दादा, पोलीस, असं लिहिलं जातं. काही वाहनांच्या (Vehicle) नंबर प्लेटला त्या नावांच्या पद्धतीनं बनवतात, ज्यामुळे बाईकचा नंबर आणि हव्या असलेल्या नावाचा उल्लेख होईल. हे अगदी नियम तोडून सर्रासपणे केलं जातं. बरं, हे सर्व जबाबदार मंडळींच्या मोठ्या गाड्यांवर देखील सर्रासपणे होताना दिसतंय. कायदे आणि वाहतूक नियमांचे सर्व नियम धाब्यावर बसवून अशा प्रकारचे कृत अलीकडेच गोंदियात देखील समोर येत आहे. लोक गाड्यांवर भाऊ, दादा अशा प्रकारचे शब्द लिहितात, यामुळे नंबर प्लेट स्पष्ट दिसत नाही आणि वाहतूक नियमांचं देखील उल्लंघन केलं जातं. आता यावर गोंदियात खास ड्राइव्ह घेण्यात आला आहे.

 दादा, भाऊ पहिल्यांदा दंड

गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शाखेकडून खास ड्राइव्ह घेण्यात आला आहे. आता तुम्ही वाहनांवर दादा, मामा लिहिल्यास आणि तेच गोंदिया वाहतूक पोलिसांच्या दृष्टीस पडल्यास तुम्हाल दंड आकारल्या जाऊ शकतो. पोलिसांनी तुमच्या वाहनांच्या नंबर प्लेटवर पहिल्यांदा भाऊ, दादा किंवा तत्सन नाव पहिल्यांदा पाहिल्या 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा तोच अपराध केल्यास दीड हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. सुधारित वाहतुक कायद्यात ही तरतुद करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शाखा त्यासाठी खास ड्राइव्ह घेत आहे. वाहनांच्या नंबरप्लेटसह वाहनावर दादा, मामा, पोलीस असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. अनेक जण वाहनांवर नंबर टाकतानाच दादा, नाना, काका या नावांसह पोलीस, प्रेस, व्हीआयपी असे देखील लिहितात. मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या नंबर शिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात.

हे सुद्धा वाचा

गोंदियाच नव्हे राज्यभरात असा प्रकार

दादा, भाऊ, अशा नंबर प्लेटवर यापूर्वी देखील राज्यातील इतर भागात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, हे त्यावेळी देखील तत्पुरत्या स्वरुपाची कारवाई असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पुन्हा लोक वाहनांवर भाऊ, दादा, काका, नाना असे शब्द टाकताना दिसून आले. यावर कायमस्वरुपी कारवाई करण्याची गरज आहे. कुणालाही किंवा कोणत्या बड्या आणि जबाबदार मंडळींच्या गाडीकडे देखील दुर्लक्ष होता कामा नये, यातून वाहतूक नियमांची पुरेपुर अंमलबजावणी होईल. यातून वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर देखील आळा बसेल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.