AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेमुदत उपोषणाची हाक, सरकारने जरांगेंना मात्र एका दिवसावर आणलं; घोळ घातल्यानं ताण वाढणार?

जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो मराठा समाजाचे आंदोलक असून काहीही झालं तरी मी मुंबईत धडकणारच, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आल्यावर मी बेमुदत उपोषण करणार आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. सरकारने मात्र मोठी खेळी खेळली असून त्यांचे उपोषण फक्त एका दिवसावर आणण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

बेमुदत उपोषणाची हाक, सरकारने जरांगेंना मात्र एका दिवसावर आणलं; घोळ घातल्यानं ताण वाढणार?
manoj jarange patil and devendra fadnavis
| Updated on: Aug 27, 2025 | 5:07 PM
Share

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना अखेर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी मिळालेली आहे. ही परवानगी देताना जरांगे यांना एकूण आठ अटी घालण्यात आल्या आहेत. जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात येणार आहेत. या आंदोलनासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो मराठा समाजाचे आंदोलक असून काहीही झालं तरी मी मुंबईत धडकणारच, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आल्यावर मी बेमुदत उपोषण करणार आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. सरकारने मात्र मोठी खेळी खेळली असून त्यांचे उपोषण फक्त एका दिवसावर आणण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

सरकारने नेमका काय आदेश दिला?

जरांगी यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता राज्य सरकारने त्यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी मुंबईत आलो तर परत माघारी फिरणार नाही. तिथे बेमुदत उपोषण करणार आहे, असे जरांगे यांनी वेळोवेळी सांगितलेले आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता ते मुंबईला निघाले आहेत. सध्या मुंबईत गणेशोत्सवामुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली होती. मात्र आम्ही आंदोलनावर ठाम असून न्यायालयात दाद मागू असे जरांगे यांनी जाहीर केले होते. त्यांनी मुंबईकडे कूच केल्याने आता राज्य सरकारने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. हे आंदोलन त्यांना फक्त सकाळी दहा ते सायंकाली सहा वाजेपर्यंतच करता येणार आहे. वेळ संपल्यानंतर जरांगे यांना त्यांचे आंदोलन थांबवावे लागणार आहे.

फक्त एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी

विशेष म्हणजे आझाद मैदानाची क्षमता ही 5000 लोकांची आहे. तिथे इतरही आंदोलक आहेत. त्यामुळे 5000 लोकांपेक्षा जास्त लोक तिथे जमा होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याचेही सरकारने जरांगे यांना सांगितले आहे. जरांगे बेमुदत उपोषणाचा निर्धार करूनच आंतरवाली सराटीहून निघालेले आहे. तशी तयारी करून येण्याचे त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलेले आहे. सरकारने मात्र त्यांचे हे आंदोलन फक्त एका दिवसावर आणून ठेवले आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर आंदोलकांना आझाद मैदानावर थांबता येणार नाही, असेही सरकारने जरांगे यांना सांगितले आहे. सरकारने मुंबईतील गर्दीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी असा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे नवा पेच तर निर्माण होणार नाही ना? जरांगे यांचे समर्थक मुंबईत दाखल झाल्यावर नेमकं काय होणार? असं विचारलं जात आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?