संजय राऊताचा ‘या’ आमदारावर हजारो कोटीची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप
संजय राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे. देवेंद्रजी महाराष्ट्रातली लुटमार थांबवा असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय. "अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्यांचे आमदार, खासदार महाराष्ट्राची कशी लूट करतायत" असं संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटीची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे. देवेंद्रजी महाराष्ट्रातली लुटमार थांबवा असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय. “अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्यांचे आमदार, खासदार महाराष्ट्राची कशी लूट करतायत, काल पाहिलं असेल, संजय शिरसाटांचा काय विषय होता. त्यानंतर भुमरेंकडून 150 कोटींची जमीन भेट, मावळचे आमदार सुनील शेळके त्यांनी एमआयडीसीच्या जमिनीवर खाण उद्योग सुरु करुन सरकारची हजारो कोटीची रॉयल्टी बुडवली असा आरोप संजय राऊत यांनी केला.
सुनील शेळके यांच्यावर संजय राऊत यांनी काय आरोप केलेत?
सुनील शेळके यांनी शासनाची परवानगी न घेता दगड, खाणींच उत्खन्न या ठिकाणी केलं. त्या बाबत शेळकेंनी कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही.
दगड खाणींचे उत्खन्न केलेल्या या जमिनीत जवळपास 100 फुटाचे खोल खड्डे आहेत.
आंबळे गावातली जमीन एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रासाठी संपादीत केली आहे.
जमीन संपादीत करताना एमआयडीसीने खाणीच्या जमिनी वगळल्या आहेत.
पण सुनील शेळकेच्या मालकीची खाणीची जमीन एमआयडीसीने संपादीत केली आहे.
शेळकेंची जमीन औद्योगिक वापरासाठी योग्य नसतानाही संपादीत करण्यात आली आहे.
संपादीत केलेल्या जमिनीच्या बदल्यात शेळकेंना 29 हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली.
एमआयडीसीने शेळकेंची 73 लाख प्रतिएकर भाव असलेली जमीन संपादीत केली.
त्या बदल्यात एमआयडीसीकडून 2 कोटी 50 लाख प्रति एकर एवढा दर असलेली जमीन शेळकेंना देण्याचा प्रस्ताव.
भूसंपादन करताना इतर शेतकऱ्यांना बदली जमीन देण्यात आलेली नाही.
बदली जमिनीचा न्याय फक्त सुनील शेळके आणि त्यांच्या कुटुंबालाच आहे का?.
सुनील शेळकेंनी उत्खनन करताना त्या जमिनीतून जाणारे मुख्य रस्ते फोडले आहेत.
शेळकेंच्या कृत्याने ग्रामस्थाना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
शेळकेंसारखे आमदार महाराष्ट्राची लूट करुन गब्बर झालेत.
या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
