लग्न वरतायला नवरदेव थेट हेलिकॉप्टरमधून!

हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरंय... त्यात लग्न म्हटलं की त्यातली हौस पूर्ण करण्यासाठी माणूस पैसे खर्च करायला मागे-पुढे पाहत नाही अशीच एक आगळीवेगळी घटना आज चांदवडला घडली.

लग्न वरतायला नवरदेव थेट हेलिकॉप्टरमधून!

मनमाड : हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरंय… त्यात लग्न म्हटलं की त्यातली हौस पूर्ण करण्यासाठी माणूस पैसे खर्च करायला मागे-पुढे पाहत नाही अशीच एक आगळीवेगळी घटना आज चांदवडला घडली. येथे नवरी मुलीला घेण्यासाठी नवरदेव थेट हेलिकॉप्टर घेऊन आला होता. (groom went directly by helicopter to take the bride In manmad)

चांदवडच्या डॉ. पल्लवी पवार यांचा विवाह सिन्नरचे उद्योजक गोकुळ दायनेश्वर यांच्या सोबत रविवारी 10 जानेवारीला नाशिकच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये होणार आहे. आपल्या भावी पत्नीला विवाहस्थळी घेऊन जाण्यासाठी नवरदेव चक्क हेलिकॉप्टर मधून आला होता.

हेलिकॉप्टरमधून रवाना होण्याअगोदर नवदाम्पत्याने डीजेच्या तालावर नृत्य केले. त्यात वधू आणि वर या दोन्हीघरचे पाहुणे मंडळी देखील सहभागी झाले होते. चांदवड सारख्या छोट्या गावात राजकीय पक्षांचे नेते हेलिकॉप्टर मधून यायचे. मात्र आज नवरदेव हेलिकॉप्टरमधून आल्याचे पाहून लोकांना आगळावेगळा आनंद झाला.

सुरुवातीच्या काळात वधूला पालखीत घेऊन जायचे. त्यानंतर बैलगाडी आणि कालांतराने कारमधून वधू जात होती. मात्र आता वधू थेट हेलिकॉप्टर मधून जात असल्याचे पाहून जमाना ‘बदल गया है’ असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. (groom went directly by helicopter to take the bride In manmad)

हे ही वाचा

सर्वसामान्यांकडून नियमित करवसुली, मात्र श्रीमंतांवर मुंबई महापालिका मेहेरबान!

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण, केंद्र सरकारची मोठी घोषणा

Published On - 7:09 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI