AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांकडून नियमित करवसुली, मात्र श्रीमंतांवर मुंबई महापालिका मेहेरबान!

मुंबई महापालिका एकीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून सर्व कर वसूल करते तर दुसरीकडे मात्र श्रीमंतांना झुकत माप देत असल्याचे समोर आलं आहे.

सर्वसामान्यांकडून नियमित करवसुली, मात्र श्रीमंतांवर मुंबई महापालिका मेहेरबान!
MCGM Recruitment 2021
| Updated on: Jan 09, 2021 | 4:53 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिका एकीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून सर्व कर वसूल करते तर दुसरीकडे मात्र श्रीमंतांना झुकतं माप देत असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर थकवणाऱ्या 50 टॉप थकबाकीदारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. (Every month collection of tax from common people but Mumbai Municipal Corporation partiality richest people)

मुंबई महापालिकेला सर्वात मोठा महसूल जकात करामधून मिळत होता. जकात कर रद्द झाल्यावर पालिकेला मालमत्ता करातून सर्वात जास्त महसूल अपेक्षित आहे. मात्र मालमत्ता कराची तब्बल 15 हजार कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यातील टॉप 50 थकबाकीदारांकडे तब्बल 1683 कोटी रूपयांची थकबाकी आहे.

त्यात विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था आणि विकासक व गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. तसेच महापालिकेच्या 24 विभागातही टॉप 50 थकबाकीदारांची यादी काढण्यात आली आहे. त्यात एकूण 4450.79 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेची बड्या लोकांकडे शहर विभागात 1506 कोटी, पूर्व उपनगरात 686 कोटी तर पश्चिम उपनगरात 2257 कोटी रुपये थकाबकी आहे.

मोठे थकबाकीदार

एच पूर्व विभाग – फॉर्च्युन 2000 इमारती 164 कोटी ए विभागातील – ईश्वसय्या रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर 141 कोटी म्हाडा मुंबई गोरेगाव रिजन 4 – 75 कोटी एचडीआयएल – 55 कोटी सेव्हन हिल रुग्णालय – 51 कोटी एमएमआरडीए – 49 कोटी सुमेर असोसिएसट – 37 कोटी जवाला रियल इस्टेस्ट – 47 कोटी रूणवाल प्रोजेक्ट्स – 29 कोटी शिवकृपा – 35 कोटी रघुवंशी मिल – 24 कोटी म्हाडा : सुमारे 150 कोटी रुपये एसआरए : 23 कोटी हॉटेल ताज लँड एन्ड वांद्रे : 35 कोटी रुपये बिच रिसॉर्ट : 22 कोटी रुपये बॉम्बे क्रिकेट असोशिएशन : 34 कोटी रुपये वरळी वल्लभभाई स्टेडियम : 28 कोटी रुपये मुंबई विमानतळ : 25 कोटी रुपये

पालिकेला महसूल मिळत नसताना मालमत्ता कराची तब्बल 15 हजार कोटींची थकबाकी विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था आणि विकासक व गृहनिर्माण संस्थांकडे थकीत आहे. त्यापैकी टॉप ५० थकबाकीदारांकडे 1683 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही थकबाकी प्रशासनाने त्वरित वसूल करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर हा एकमेव उत्पन्न साधन आहे. सर्व 24 वॉर्ड मधील सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत लवकर हा महसूल गोळा करण्यात यावा, असे आदेश विधी समिती अध्यक्षांनी दिलेत.

(Every month collection of tax from common people but Mumbai Municipal Corporation partiality richest people)

हे ही वाचा

Bhandara Fire News LIVE | निष्काळजीपणा झाला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे : राजेश टोपे

“युतीत होतो म्हणून शिवसेनेची महापालिका, यंदा मात्र सगळीकडे भाजपचाच महापौर”

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.