Maharashtra Politics : हुश्श ! जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले, ‘हे’ असणार पालकमंत्री…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.

Maharashtra Politics : हुश्श ! जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले, 'हे' असणार पालकमंत्री...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 8:42 PM

मुंबई : शिंदे – फडणवीस (Shinde Fadnavis) सरकार स्थापन होऊन जवळपास तीन महीने उलटत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार उशिरा झाल्याने पालकमंत्री लवकरच जाहीर होतील अशी आशा अनेक मंत्र्यांना (Minister) होती. मात्र तसे घडलेच नाही. स्वातंत्रदिनाला देखील पालकमंत्री जाहीर झालेले नसतांना ठिकठिकाणी मंत्र्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थिती लावावी लागली होती. त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री कोण असणार ? अशी चर्चा सुरू होती आता या चर्चेला आता पूर्णविराम लागणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

30 जूनला शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी फक्त मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती.

तर 9 ऑगस्टला 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून 9 आमदार तर भाजपकडून 9 आमदार देण्यात आले होते.

एकूणच मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी पालकमंत्री जाहीर न झाल्याने सरकारवर टीका होत होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.