AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनोज जरांगे यांनी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले, आता आरक्षणाचा…,’ गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप काय?

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे गाड्या वाढतील, असा आरोप अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला. तसेच त्यांनी मराठा आरक्षणाचा नादा सोडावा, असा सल्ला दिला.

'मनोज जरांगे यांनी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले, आता आरक्षणाचा...,' गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप काय?
गुणरत्न सदावर्ते, मनोज जरांगे
Follow us
| Updated on: May 19, 2025 | 12:37 PM

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्लूएसच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे. त्यामुळे आता पाच टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना आर्थिक दुर्बल घटक म्हणाले, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत. मनोज जरांगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मराठा समाजाला ईडब्लूएसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते. परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्के पेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देणारे विद्यार्थीही त्यांचे किती नुकसान होत आहे, असे सांगू शकतात, असे सदावर्ते यांनी म्हटले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ येत आहे. मनोज जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारख निवडणुकीच्या वेळेला उगवतात. आता त्यांची चुळबुळ बुळबुळ सुरु झाली आहे. ते कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत. निवडणुकांमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे गाड्या वाढतील. बुजगावणे उभे केले जातील, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. संजय राऊत यांच्यावर टीका करताना सदावर्ते म्हणाले, संजय राऊत यांचा इस्लामिक विचारांचा जास्त अभ्यास झालेला दिसत आहे. शरद पवार यांनीही संजय राऊत यांना एवढे डोक्यावर का घेतले आहे? असा मला प्रश्न पडला असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी लढा देत आहे. त्यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. या समितीकडून कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरु आहे.

लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO.
अहमदाबादेत विमान कसं कोसळलं? काय घडलं? किती होते भारतीय प्रवासी?
अहमदाबादेत विमान कसं कोसळलं? काय घडलं? किती होते भारतीय प्रवासी?.
अपघातानंतर विमान थेट वसतिगृहावर कोसळलं अन्..
अपघातानंतर विमान थेट वसतिगृहावर कोसळलं अन्...
पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना
पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना.