AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे कार्यकर्त्याकडून सदावर्ते यांना धमकी; ‘गाडी फोडू, घरावर…’, ऑडिओ क्लिप समोर

मोठी बातमी समोर येत आहे, राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मनसे कार्यकर्त्याकडून गुणरत्न सदावर्ते यांना आता धमकी देण्यात आली आहे, त्याची ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे.

मनसे कार्यकर्त्याकडून सदावर्ते यांना धमकी; 'गाडी फोडू, घरावर...', ऑडिओ क्लिप समोर
Gunaratna Sadavarte Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 6:59 PM
Share

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांना मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांना धमकी देण्यात आली आहे. गाडी फोडण्याची धमकी सदावर्ते यांना देण्यात आली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर मनसे कार्यकर्त्याकडून गुणरत्न सदावर्ते यांना धमकी देण्यात आली आहे. याची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे.

नेमकं काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये? 

मनसे कार्यकर्त्यानं गुणरत्न सदावर्ते यांना फोन केला,  त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी विचारलं कोण बोलतय? सदावर्ते यांच्या या प्रश्नावर मी राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र सैनिक बोलतोय असं सांगण्यात आलं. त्यानंतर तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कशाला देता? असा सवाल सदावर्ते यांना करण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी सांगितलं की,  नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. तीन भाषा शिकवण्याचा अधिकार आहे. मला सांगा जर तीन भाष शिकण्याचा अधिकार असल्यानंतर आपण लोकांच्या पोरांना खिशातल्या पैशांनी शिकवतो का ओ?

त्यानंतर मनसेच्या कार्यकर्यानं गुणरत्न सदावर्ते यांना धमकी दिली. तुमच्या घरावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल, उद्या जर तुम्ही गाडीमध्ये असाल तर गाडीची काच फोडली जाईल हे लक्षात ठेवा, असं मनसे कार्यकर्यानं सदावर्ते यांना म्हटलं. दरम्यान त्यानंतर सदावर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले. मला हल्ल्याची भीती वाटत नाही, तुम्ही अशा धमक्या मला देऊ नका, राज ठाकरे यांना सुधारायला सांगा, असं सदावर्ते यांनी या मनसेच्या कार्यकर्त्याला म्हटलं.

हिंदी भाषेच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक 

दरम्यान राज्य सरकारनं आता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, मनसेकडून राज्य सरकारच्या या धोरणारविरोधात आक्रमक भूमिका घेत विरोध करण्यात आला आहे.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!