AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? असं सदावर्ते का म्हणाले? त्यानंतर पाटलांना थेट चॅलेंजच देऊन टाकलं

मनोज जरांगे पाटील हे येत्या 16 मे रोजी आपल्या पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहेत, दरम्यान यावरून पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जरांगे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? असं सदावर्ते का म्हणाले? त्यानंतर पाटलांना थेट चॅलेंजच देऊन टाकलं
सदावर्ते यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 09, 2026 | 6:07 PM
Share

आज ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी येथील शांतीलाल झुंगे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते जालन्यामध्ये आले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे, येत्या 16 तारखेला पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे हे काही नाशिकचे खरात बाबा आहेत का? तारखा सांगायला. 16 तारीख कशासाठी निवडली? असा हल्लाबोल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, यावरून देखील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

गुणरत्न सदावर्ते हे आज जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी येथील शांतीलाल झुंगे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना खोचक टेला लगावला आहे. मनोज जरांगे पाटील हे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? तारीख सांगायला. त्यांनी 16 तारीखच का निवडली, हे त्यांनी सांगावं असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा सुफडासाफ झाला आहे. बीड जिल्ह्यातल्या एकाही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता नाही.  त्यामुळे जरांगे यांनी सासुरवाडीच्या नवे तर स्वतःच्या ग्रामपंचायतीत सदस्य व्हावं असं थेट चॅलेंज देखील यावेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, यावरून देखील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  उद्योग मंत्री उदय सामंत येऊन गेले आणि जरांगे यांनी उद्योग सुरू केले. एकीकडे तारखा द्यायच्या आणि दुसरीकडे रेतीचा उपसा करायचा, त्यांचे रेतीचे टिप्पर मोजायला आता मला माणूस सोडावा लागेल असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण..
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण...
कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा..
कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा...
अजित पवारांनंतर अर्थखात्याचा तिढा, हसन मुश्रीफांचा मोठा दावा.....
अजित पवारांनंतर अर्थखात्याचा तिढा, हसन मुश्रीफांचा मोठा दावा......
मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट...
मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट....
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी.
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज.
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?.
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'..
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'...