AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही ‘असा’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केलाय का? तर लगेच डिलीट करा, अजितदादांचा कडक इशारा, म्हणाले कोणाचीच हयगय करणार नाही

सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात कडक इशारा दिला आहे.

तुम्हीही 'असा' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केलाय का? तर लगेच डिलीट करा, अजितदादांचा कडक इशारा, म्हणाले कोणाचीच हयगय करणार नाही
| Updated on: Jan 26, 2025 | 8:05 PM
Share

इंदापुरातील सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियाच्या होणाऱ्या चुकीच्या वापराबद्दल देखील चांगलेच कान टोचले आहेत.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?   

बारामतीत एका शाळेत एकमेकांकडे पाहाण्यावरून मुलांनी मारामारी केली, कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरीही कायदा त्याला दाखवा. पोलिसांनी मोठ्या बापाचा मुलगा असला म्हणून हयगय करू नये. अलीकडे कॅफेचा नवीन पायंडा पडला आहे, कॅफेत काहीही वेडेवाकडेपणा चालतो. लक्षात घ्या काळ कोणासाठी थांबत नाही.  शाळेत शिकणारी मुले काही ना काही चुकीचे करतात, मी त्या शिक्षण संस्थेचे नाव घेत नाही. एकमेकांकडे का बघितलं म्हणून भांडणं होतात कोयत्याने देखील वार केले जातात, हे प्रकार थांबले पाहिजेत. मी पोलिसांना सांगितले आहे, की अशा प्रकरणात कोणाचेही लाड करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीस खात्याने शक्ती अभियान सुरू केले आहे. खऱ्या अर्थाने कोण चुकत असेल तर तो कितीही मोठ्या बापाचा पोरगा असेल, पोरगी असेल तर हयगय करू नका सगळ्यांना कायदा नियम सारखा आहे. शक्ती अभियानाच्या माध्यमातून आम्ही यावर लक्ष केंद्रित केलं आहे. शक्ती अभियानाच्या संपर्क नंबर वर कोणीही गंमत म्हणून फोन करू नका. आम्हाला जर कळलं की गंमत म्हणून फोन केला तर त्याची अशी गंमत करीन की त्याच्या दहा पिढ्या आठवणीत राहील.

काही मुलांनी नो कॉम्प्रोमाइज ग्रुप अशा पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप  आणि इन्स्टाग्राम ग्रुप तयार केले आहेत, ते लगेच बंद करा. मुलांनो जर तुम्ही चुकीच्या रस्त्यानं गेलात तर अलिकडे काहीही शोधता येतं. त्यामुळे अशा गोष्टींना अजिबात थारा देऊ नका.  लहान वयात कधीकधी मुला मुलींचा पाय घसरतो कृपा करून आपण आपल्या आई वडिलांना कमीपणा वाटेल असं कृत्य करू नका. तुमच्यावर राज्याचे, देशाचे भवितव्य अवलंबून आहे.  तुम्ही उद्या देशाचे जबाबदार नागरिक बनणार आहात. तुम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.