Holi 2021: कोरोनाच्या निर्बंधांमुळे नागरिकांकडून घरात सेलिब्रेशन; चिकन-मटणाच्या खरेदीसाठी दुकानांबाहेर रांगा

राज्यातील अनेक भागांमध्ये चिकन आणि मटण खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे. | Holi 2021

Holi 2021: कोरोनाच्या निर्बंधांमुळे नागरिकांकडून घरात सेलिब्रेशन; चिकन-मटणाच्या खरेदीसाठी दुकानांबाहेर रांगा

नागपूर: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने होळी आणि धुलीवंदनाच्या सणावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी किमान घरात जोरदार सेलिब्रेशन करायचे ठरवले आहे. त्यामुळे नागपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये चिकन आणि मटण खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चिकन-मटण दुकानांबाहेर रांगा लागलेल्या आहेत. (Holi and Dhuliwandan celebration in Nagpur)

ही संधी साधून व्यावसायिकांनी चिकन आणि मटणाच्या दरातही वाढ केल्याचे दिसत आहे. नागपुरात दुपारी एक वाजेपर्यंतच दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिकन आणि मटणाच्या खरेदीसाठी सकाळचाच मुहूर्त साधायचा ठरवले आहे. नागपुरातील दुकानांबाहेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काळजी घेतली जात आहे. दुकानदारांकडून ग्राहकांना टोकन दिले जात आहे. त्याप्रमाणे ग्राहक दुकानात जाऊन चिकन आणि मटन खरेदी करत आहेत.

नागपुरात चिकन आणि मटणाचे दर खालीलप्रमाणे

गावरान चिकन – 600 रुपये किलो
कोकरेल चिकन – 200 रुपये किलो
बॉयलर चिकन – 150 रुपये किलो
लेगॉन चिकन – 90 रुपये किलो
मटण – 740 रुपये प्रति किलो

मुंबईत धुळवड खेळायला गेलात तर पोलिसांकडून कारवाई होणार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारकडून होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईत नेहमीप्रमाणे धुळवड साजरी करता येणार नाही. यानंतरही नागरिकांनी ऐकले नाहीच तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. (Holi Rangpanchmi festival in Mumbai rules and regulations)

अर्थात धुळवड घरातल्या घरात खेळता येईल पण चाळ किंवा इमारतीच्या आवारात सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.

काय आहेत नियम?

होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई केली जाईल.

संबंधित बातम्या :

Holi 2021 | होळीचा शुभ मुहूर्त ते पौराणिक महती, जाणून घ्या सर्व काही

होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध: भातखळकर

Maharashtra lockdown update : राज्यात लॉकडाऊनची दाट शक्यता, सरकारकडून कोणती खबरदारी?

(Holi and Dhuliwandan celebration in Nagpur)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI