पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा अहवाल लवकरच, त्यानंतर पुढील कारवाई करु : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत (Shambhuraj Desai on Gopichand Padalkar statement).

पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा अहवाल लवकरच, त्यानंतर पुढील कारवाई करु : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 6:10 PM

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल (Shambhuraj Desai on Gopichand Padalkar statement). पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा तपास समोर आल्यावर पुढची कारवाई करु”, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. ते आज (29 जून) वाशिम येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (Shambhuraj Desai on Gopichand Padalkar statement).

“गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपचा तपास लवकरच समोर येईल. ज्या दिवशी हे प्रकरण समोर आलं त्याचदिवशी राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल. अहवाल प्राप्त झाला की पुढची कारवाई केली जाईल”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. याशिवाय पडळकारांविरोधात बीड आणि पुण्यातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

मूळ बातमी वाचा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. या संकट काळात विरोधी पक्षाने साथ दिली पाहिजे. सरकारसोबत काम केलं पाहिजे. ही राजकारणाची वेळ नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे सांगायला पाहिजे. मात्र, विरोधी पक्ष राज्य सरकारसोबत राहायचं सोडून हे सरकार अपयशी आहे, अशी टीका करत आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.

“काही खाजगी रुग्णालये भरमसाठ पैसे आकारत असल्याचं समोर येत आहे. याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना संकट काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट केली गेली तर अशा रुग्णालयांची चौकशी केली जाईल. याशिवाय त्यांच्यावर कारवाई करु”, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.

दरम्यान, शंभूराज देसाई  यांनी याआधीच  गोपीचंद पडळकरांनी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. भाजपच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत शंभुराज देसाई यांनी दिले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पडळकरांना कारवाईचा इशारा दिला आहे.

पडळकर काय म्हणाले होते?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.