शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची चिन्हं, पडळकरांवर कारवाईचा गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला

शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची चिन्हं, पडळकरांवर कारवाईचा गृहराज्यमंत्र्यांचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 7:48 AM

सातारा : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली जहरी टीका भोवण्याची चिन्हं आहेत. पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर टीका केली होती. (Home MoS Shambhuraj Desai Hints at Action against Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. भाजपच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत शंभुराज देसाई यांनी दिले आहेत.

मूळ बातमी वाचा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ, ऑडिओ क्लिप जमा करुन तपासण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत. त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश शंभुराज देसाई यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

दरम्यान, गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने आज (गुरुवारी सकाळी 10 वाजता) आंदोलनाची हाक दिली आहे. पुण्यात लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे राष्ट्रवादी आंदोलन छेडणार आहे. “गोपीचंद पडळकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते जातील तिथे आंदोलन करु, फक्त राष्ट्रवादीच नाही, तर महाराष्ट्राच्या आदरणीय नेत्याबद्दल त्यांनी केलेली टीका भाजपला मान्य आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

पडळकर काय म्हणाले?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना  विधानपरिषदेला संधी दिली.

संबंधित बातम्या :

शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

मी, तटकरे, धनंजय बहुजनच, पडळकरांनी राज्यात फिरुन दाखवावं : जितेंद्र आव्हाड

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

(Home MoS Shambhuraj Desai Hints at Action against Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.