AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

"शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत" या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे (NCP Reaction on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक
| Updated on: Jun 24, 2020 | 3:16 PM
Share

मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” या पडळकरांच्या टीकेवर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. विद्या चव्हाण, अमोल मिटकरी यांच्यासह स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीही पडळकरांवर बरसले. (NCP Reaction on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं मूर्खपणाचं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपटून मार खाल्ला. धर्मांध शक्तींना विरोध करणारे शरद पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री किंवा ‘यांना’ पवारांचा अडसर वाटणे स्वाभाविक आहे. आधी, तुमच्या भाजपने बहुजनांवर काय अत्याचार केले, ते बघावे. मूर्ख माणसं बडबडत असतात. आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिली.

“गोपीचंद पडळकर ज्या विचारधारेचे नेते आहेत, ती विचारधाराच जहरी आहे. त्यांचे बारामतीमध्ये डिपॉझिट जप्त झाले. त्यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका बहुजनविरोधी आहे. त्यांनी सांभाळून बोलावे, अन्यथा त्यांना आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

“राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात” अशी टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

दरम्यान, गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने उद्या (गुरुवारी सकाळी 10 वाजता) आंदोलनाची हाक दिली आहे. पुण्यात लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे राष्ट्रवादी आंदोलन छेडणार आहे. “गोपीचंद पडळकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते जातील तिथे आंदोलन करु, फक्त राष्ट्रवादीच नाही, तर महाराष्ट्राच्या आदरणीय नेत्याबद्दल त्यांनी केलेली टीका भाजपला मान्य आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

मूळ बातमी इथे वाचा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

“गोपीचंद पडळकर यांना असंस्कृत, मुजोर वक्तव्याबद्दल माफी मागावी लागेल. भाजपचा धिक्कार असो” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केली. तर “पडळकर यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांनी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार करुन घ्यावेत, त्यांच्या उपचारासाठी येणारा सर्व खर्च राष्ट्रवादी करेल” असं राष्ट्रवादी युवा काँग्रेसने म्हटलं.

“महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे” अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

“राजकारणात विरोध असावा, मात्र वैयक्तिक टीका कोणत्या पातळीवर करावी, याला मर्यादा असतात. आमचेही मतभेद होते, मात्र पडळकर यांनी राजकीय सभ्यता शिकून घ्यावी” असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

(NCP Reaction on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

पडळकर काय म्हणाले?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना  विधानपरिषदेला संधी दिली.

संबंधित बातमी :

उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये : गोपीचंद पडळकर

(NCP Reaction on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.