शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत," असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी (Devendra Fadnavis on Gopichand Padalkar) सांगितले.

शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 4:21 PM

सोलापूर : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशी जहरी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. “शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणं चुकीचं आहे,” असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

“मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. सोलापुरातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

दरम्यान, गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने उद्या (गुरुवारी सकाळी 10 वाजता) आंदोलनाची हाक दिली आहे. पुण्यात लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे राष्ट्रवादी आंदोलन छेडणार आहे. “गोपीचंद पडळकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते जातील तिथे आंदोलन करु, फक्त राष्ट्रवादीच नाही, तर महाराष्ट्राच्या आदरणीय नेत्याबद्दल त्यांनी केलेली टीका भाजपला मान्य आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

पडळकर काय म्हणाले?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. (Devendra Fadnavis on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

संबंधित बातम्या : 

Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.