Gopichand Padalkar | मी, तटकरे, धनंजय बहुजनच, पडळकरांनी राज्यात फिरुन दाखवावं : जितेंद्र आव्हाड

"गोपीचंद पडळकर यांना आपण काय बोलतो ते कळतं का? त्यांची उंची किती आणि ते बोलतात किती?", अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली (Jitendra Awhad slams Gopichand Padalkar).

Gopichand Padalkar | मी, तटकरे, धनंजय बहुजनच, पडळकरांनी राज्यात फिरुन दाखवावं : जितेंद्र आव्हाड
चेतन पाटील

|

Jun 24, 2020 | 4:05 PM

मुंबई : “बहुजन म्हणजे काय फक्त भाजप नेते गोपीचंद पडळकर? राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे बहुजनच आहेत (Jitendra Awhad slams Gopichand Padalkar). राष्ट्रवादीतील 70 टक्के नेते बहुजन आहेत. मी स्वत: बहुजन आहे, धनंजय मुंडे बहुजन आहेत, त्यांना संधी दिली नाही का?”, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला (Jitendra Awhad slams Gopichand Padalkar).

भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकरांच्या या टीकेवर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांवर सडकून टीका केली.

“गोपीचंद पडळकर यांना आपण काय बोलतो ते कळतं का? त्यांची उंची किती आणि ते बोलतात किती? ते ज्या पक्षात आहेत तो पक्ष मनुवाद्याचं समर्थन करतो. ते मनुवाद्यांच्या माडीला मांडी लावून बसतात”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“शरद पवारांनी महाराष्ट्रातील बारा बलुतेदारांना पद, प्रतिष्ठा मिळवून दिली”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. याशिवाय “सध्याच्या कोरोना संकट काळात पडळकरांनी महाराष्ट्रात फिरुन दाखवावं”, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना दिलं आहे.

“शरद पवार यांच्यावरील अशाप्रकारची टीका राष्ट्रवादी खपवून घेणार नाही. कॅमेऱ्यावर मी काही सांगणार नाही. पण याचे तीव्र पडसाद उमटतील. ते महाराष्ट्र पाहील”, असंदेखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे”, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना  विधानपरिषदेला संधी दिली.

संबंधित बातमी :

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें