AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी खूशखबर, घराच्या किंमती घसरल्या, सरकारच्या निर्णयाचा फायदा घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील घरं सहा लाखांनी स्वस्त होणार आहेत (Houses in Mumbai will be cheaper by Rs 6 lakh). बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रीमियम शुल्कात कपात केल्याने, आता घरे स्वस्त होण्याची आशा बळावली आहे (Houses in Mumbai will be cheaper by Rs 6 lakh). हा लाभ घेणाऱ्या […]

मुंबईकरांसाठी खूशखबर, घराच्या किंमती घसरल्या, सरकारच्या निर्णयाचा फायदा घ्या
| Updated on: Jan 08, 2021 | 10:01 AM
Share

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील घरं सहा लाखांनी स्वस्त होणार आहेत (Houses in Mumbai will be cheaper by Rs 6 lakh). बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रीमियम शुल्कात कपात केल्याने, आता घरे स्वस्त होण्याची आशा बळावली आहे (Houses in Mumbai will be cheaper by Rs 6 lakh).

हा लाभ घेणाऱ्या बिल्डरांना ग्राहकांचे मुद्रांक शुल्क स्वत: भरायचे आहे. पण, निव्वळ प्रीमियम कपातीचा लाभ ग्राहकांना मिळाल्यास मुंबईसारख्या शहरात सरासरी 6 लाख रुपयांपर्यंत घरे स्वस्त होऊ शकतात.

बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर (अधिमूल्य) 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील, त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला.

गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतलेला होता. या सवलतीची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत आहे. जे प्रकल्प अधिमूल्य सवलतीचा लाभ घेऊ इच्छितात त्या सर्व प्रकल्पांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे राज्य शासन अधिमूल्यामध्ये जी सवलत देऊ इच्छिते त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देखील मिळणार आहे.

जुनी मुंबईच आवडती

सायन ते कुलाबा भागात मालमत्ता खरेदी सर्वात जास्त झाली आहे. तीन महिन्यात 6,439 घरांची खरेदी झाली आहे. एकूण महसूलात 45 टक्के वाटा हा कुर्ल्याचा आहे. तर बोरीवलीलाही अधिक पसंती आहे. सर्वात कमी व्याजदर, मुद्रांक शुल्कातील कपात शुल्कातील कपात आदि सवलतींमुळे डिसेंबर महिन्यातील मालमत्ता खरेदीत अभूतपूर्व वाढ झाल्य़ाचे दिसून आले. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीचा विचार केल्यास जुनी मुंबईत सर्वाधिक घर खरेदी झाली आहे.

विरोधकांची टीका

अधिमूल्यात सवलतीचा हा निर्णय जाहीर झाल्या झाल्या त्यावरुन राजकीय नाट्यही रंगत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मूठभर बिल्डर लोकांच्या लॉबीसाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतल्याची टीका सरकारवर केली (Houses in Mumbai will be cheaper by Rs 6 lakh).

प्रत्यक्ष ग्राहकांना लाभ

या निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना प्रिमिअममध्ये जी सवलत दिली जाणार आहे, त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देखील मिळणार आहे. राज्याच्या बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दिपक पारेख यांच्या समितीची स्थापना करण्यात आली होती. बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक अधिक आकर्षक करण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढावी याकरीता समितीने सूचनांसह आपला अहवाल शासनास सादर केला. समितीने शिफारस केल्याप्रमाणे शासनाकडून बांधकाम प्रकल्पांतील सर्व अधिमूल्यावर 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50% सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे.

Houses in Mumbai will be cheaper by Rs 6 lakh

संबंधित बातम्या :

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत

ठाकरे सरकारचे महत्त्वाचे 8 निर्णय; विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत मिळणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.