अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात? उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच घेरलं

जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत. ते जनतेने दाखवून दिले आहे. आता तुम्ही दाखविणार आहात की नाही? सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की किती अंत बघणार आहात? न्याय मिळाला पाहिजे.

अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात? उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच घेरलं
uddhav thackeray (1)Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 9:40 PM

लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हापासून आपली लढाई सुरु झाली आहे. अजूनही ही लढाई सुरूच आहे. आता आपण मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक लढतोय. या जागा आपल्या हव्याच. त्या मला जिंकून पाहिजेत. नाशिक शिक्षक मतदारसंघही मला जिंकून पाहिजे. दोन्ही विजय मला हवे आहेत. जी लढाई सुरु झाली आहे ती सुरूच रहाणार आहे. आता थांबायचे नाही. शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही. 11 विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत. त्याची निवडणूक होणार आहे. आमदारांच्या मतांवर ही निवडणूक होत आहे. पण, ज्याच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते आमदार निवडणुकीत मतदान कसे करू शकतात? निवडणूक प्रक्रिया सुरु केलीच कशी? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक सुरू झाली आहे. विधानसभेतील आमदार ते 11 आमदार निवडून देणार आहे. पण, गद्दार आमदारांचे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे असे असताना ही निवडणूक होऊच कशी शकते. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना निवडणूक कशी होऊ शकते? आता म्हणतील की निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पण, ही प्रक्रिया सुरूच कशी झाली. अपात्र आमदार, गद्दार आमदार मतदान करूच कसे शकतात असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेनेचा निर्णया व्हायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय बाकी आहे. त्यामुळे कोर्टाला विनंती आहे की आणखी किती वेळ घेणार आहात? ते 40 आमदार अपात्र झाले तर निवडणूक होऊ शकेल का? जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत. ते जनतेने दाखवून दिले आहे. आता तुम्ही दाखविणार आहात की नाही? सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की किती अंत बघणार आहात? न्याय मिळाला पाहिजे. पण, त्याला विलंब लागत असेल तर कसे चालेल. न्याय मेला तर कसे होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात जाऊ द्या ना घरी. आता वाजवले की बारा. वाजले की बारा. तिकडचे ते म्हणतात नाही और सत्यानाश करो. काही झालं तर जबाबदारी घ्यायची ताकद नाही असे सरकार चालले आहे. पदवीधर आणि शिक्षक आपण लढत आहोत. आपल्या विजय पाहिजे. मुंबईत आणि नाशिकमध्ये. लढाई लढायची आहे. लढाई सुरू झाली आहे. ही लढाई वैयक्तिक नाही. ही लोकशाहीची आणि संविधानाची, न्याय्याची लढाई आहे. ती जिंकायलाच हवी असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
दादांनी योजनेचं नावच बदलल, आता लाडकी... शरद पवार गटातील नेत्याचा आरोप
दादांनी योजनेचं नावच बदलल, आता लाडकी... शरद पवार गटातील नेत्याचा आरोप.
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात..
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात...
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.