AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर्मनीच्या भागीदारीतून महाराष्ट्रात गुंतवणूक कशी वाढली? मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये सांगितलं

जर्मनीमध्ये न्यूज9 चं ग्लोबल समिट सुरू आहे, या ग्लोबल समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली.

जर्मनीच्या भागीदारीतून महाराष्ट्रात गुंतवणूक कशी वाढली? मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 9:01 PM
Share

जर्मनीमध्ये न्यूज9 चं ग्लोबल समिट सुरू आहे, या ग्लोबल समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, भारत आणि जर्मनी यांचा एकमेंकावर विश्वास आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत बनले आहेत. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जर्मनी हा महाराष्ट्राचा विकास, स्टार्टअप आणि दीर्घकालीन यशाचा भागीदार आहे. जर्मनी हे ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि स्टार्ट्सअप यामध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र हा मजबूत उत्पादन, सेवा क्षेत्र आणि वेगानं वाढणारी स्रार्टअप इकोसिस्टीम असलेलं भारताचे औद्योगिक इंजिन म्हणून उभे राहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले आहेत, हे संबंध जे भविष्यातील उद्योग उभारणीच्या उद्देशानं व्यापाराच्याही पलीकडे खऱ्या सहकार्याकडे वळले आहेत. राज्यातील पुणे शहर ज्याला जर्मन गुंतवणूकदारांचे प्रवेशद्वार म्हटलं जातं, ते देशातील प्रत्येक पाच जर्मन कंपनींपैकी एका कंपनीचं घर बनलं आहे, यातून दोन्ही देशांमध्ये असलेला ताळमेळ स्पष्ट होतो. फोक्सवॅगन, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज सारख्या जर्मन कंपन्यांनी महाराष्ट्राला आपले दुसरे घर बनवले आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.

महाराष्ट्राचं भारताच्या जीडीपीमध्ये जवळपास 14 टक्के एवढं योगदान आहे, तसेच औद्योगिक उत्पादन आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये देखील क्रमांक एकच राज्य आहे. 2024 मध्ये एकट्या महाराष्ट्रात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे, ज्याचं प्रमाण एकूण राष्ट्रीय गुंतवणुकीपैकी 31 टक्के इतकं आहे, अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली आहे, महा-परवाना, सिंगल विंडो क्लियरंस सिस्टीम यासारखे आमची धोरण गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्रात अधिक आकर्षित करतात, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान भारत आणि जर्मनीमधील भागीदारीचे महत्त्व अधोरेखीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर्मनी अभियांत्रिकीमध्ये उत्कृष्टता आणि अचूकता आणते तर भारत कौशल्ये, युवा ऊर्जा आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा प्रदान करतो.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.