किरकोळ भांडणामुळे पती संतापला, क्षणात पत्नीला संपवलं, डोंबिवली हादरली!
Dombivli Crime : डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात किरकोळ वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेनंतर पती घटनास्थळावरून फरार झाला आहे.

डोंबिवलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोळेगाव परिसरात किरकोळ वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेनंतर पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. ज्योती धाहीजे असे मृत महिलेचे नाव असून पोपट धाहीजे अस हत्या करणाऱ्या फरार पतीचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीसानी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन विशिष्ट पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र आता या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोळेगाव परिसरातील घटना
डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात काल सकाळी ही धक्कादायक घटना घडली. आहे ज्योती धाहीजे नावाच्या महिलेची तिचा पती पोपट धाहीजे याने गळा आवळून हत्या केली. हे दाम्पत्य मूळचे जालन्यातील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने डोंबिवलीत वास्तव्याला आले होते. काल सकाळी दोघांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून ही हत्या झाली शेजाऱ्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
आरोपीला शोधण्यासाठी पालीसांची तयारी
आरोपी पती पोपट धाहीजे याचा शोध घेण्यासाठी मानपाडा पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. अधिक कौटुंबिक वादातून घडलेल्या या क्रूर हत्येमुळे परिसरात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण आहे. पोलीस फरार पतीचा कसून शोध घेत आहेत. स्थानिकांना आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, याआधीही किरकोळ वादातून अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. डोंबिवलीतील या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी अशी 3 अपत्ये आहेत. ही मुले आता पोरकी झाली आहेत. या घटनेटी माहिती मिळाल्याने पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी आता मृत ज्योती धाहीजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे. पोपटने ज्योतीचा खून का केला याचे कारण पोपटला अटक केल्यानंतर समोर येणार आहे. त्यामुळे पोलीस युद्धपातळीवर त्याचा शोध घेत आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करून कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
