AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : सूर्य कोपणार… अंगाची लाही-लाही होणार, हे दोन दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज एकदा वाचाच

Maharashtra Heatwave Alert : हवामान विभागाने पुन्हा एकदा तापमान वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने राज्याच्या काही भागात उष्णतेचा येलो अलर्ट जारी केली आहे.

Weather Update : सूर्य कोपणार... अंगाची लाही-लाही होणार,  हे दोन दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज एकदा वाचाच
Weather Heat AlertImage Credit source: Google
| Updated on: May 11, 2026 | 5:00 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानत झपाट्याने बदल होताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कडक उन्हाळा जाणवत होता, तापमान 45 डिग्रीच्या वर गेले होते, मात्र त्यानंतर राज्याच्या विविध भागांना अवकाळीचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी पाऊस कोसळल्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता हवामान विभागाने पुन्हा एकदा तापमान वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने राज्याच्या काही भागात उष्णतेचा येलो अलर्ट जारी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विदर्भातील तापमान वाढणार

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटले की, ‘वादळी वारे अवकाळी पावसाच्या नंतर आता विदर्भात पुन्हा सूर्य देवतेचा कोप होणार आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यात तापमान वाढणार आहे. आता कुठलेही मोसमी प्रणाली बनलेली नाही त्यामुळे विदर्भातील तापमान वाढणार आहे. काही ठिकाणी दोन ते चार अंश सेल्सियस तर काही ठिकाणी चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढणार आहे.’

या जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुढे बोलताना प्रवीण कुमार यांनी सांगिलते की, ’14 आणि 15 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागात हीट वेव्हची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील तापमान 44 ते 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राजस्थानामध्ये प्रति चक्रवात बनला आहे, त्याच्या प्रभावामुळे त्या भागामध्ये 46 पर्यंत तापमान गेले, तो चक्रवात हळूहळू मध्य प्रदेश कडे येणार आहे आणि त्याचा प्रभाव विदर्भावर जाणविण्याची शक्यता आहे’ असंही नागपूर हवामान विभागाने म्हटलं आहे.

नंदुरबारमध्ये विक्रमी तापमानाची नोंद

विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. आज तापमानाचा पारा 45.5° सेल्सिअस वर गेला आहे. तापमानाच्या या आकड्याने अनेक वर्षांचे उष्णतेचे विक्रम मोडले आहेत. आता पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?