AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : बदलापुरातून शिवसेना सपाट, सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात, पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिकांचाही सेनेला ‘जय महाराष्ट्र’

Shivsena : कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवलाय. पंचायत समिती सदस्य बाळासाम कांबरी आणि इतर सदस्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे.

Shivsena : बदलापुरातून शिवसेना सपाट, सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात, पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिकांचाही सेनेला 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदे गटात Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 7:08 PM
Share

बदलापूर – शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला पाठिंबा देण्याचे कार्यक्रम सध्या ठिकठिकाणी होत आहेत. बदलापूर नगरपालिकेच्या (Kulgaon-Badlpaur)शिवसेनेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी  एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांनीही एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे (Vaman Mhatre) यांच्यासह माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवलाय. पंचायत समिती सदस्य बाळासाम कांबरी आणि इतर सदस्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे.

बदलापूर शहरातील शिवसेना शिंदेंसोबत

बदलापुरात सगळ्याच पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने आता बदलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही पदाधिकारी आता नसल्याचे सांगण्यात येते आहे. मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरानथ इथल्या शिवसेना माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच शिंदेंना पाठिंबा दिला होता. बदलापूर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र शनिवारी शिंदे यांना भेट भूमिका स्पष्ट केली आहे.

महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारीही शिंदेंसोबत

शिवसेनेचे २५ माजी नगरसेवक होते. त्यातील एकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला तर एकाचे निधन झाले. त्यामुळे नगरसेवकांची संख्या २३ वर आली होती. त्यातील दोन माजी नगरसेवक वगळता सगळेजण शिंदेंच्या भेटीला पोहचले. हे दोघेही माजी नगरसेव शिंदे गटासोबतच असल्याची माहिती आहे. यांच्यासोबत पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे.

शिवसेनेला कुठे कुठे खिंडार

बदलापूरच नव्हे तर ठाण्यासह राज्यातील विविध भागात शिवसेनेला मोठं खिंडार पडले आहे. ठाण्यातील एक नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक शिंदे गटात आले आहेत. म्हणजे ठाण्यातून शिवसेना पूर्णपणे सपाट झाली आहे. नवी मुंबईतील 33, मीरा भाईंदरच्या 12, उल्हासनगरमधील 15, अंबरनाथमधील 20 आणि मुंबईतील एका नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत फक्त शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि अंबरनाथमधील नगरसेवक शिंदे गटात आल्याने शिंदे गट अधिक पॉवर फुल झाला आहे.

तर हिंगोली आणि यवतामाळमधील नगरसेवक, पंचायत, जिल्हापरिषद आणि नगरपरिषद सदस्यही शिंदे गटात सामील झाले आहेत. औरंगाबाद, यवतमाळ, हिंगोलीसह राज्यातील इतर भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.