बेपत्ता महिलेचा तीन वर्षांनी शोध, शिर्डीतून महिला गायब का होतात?

दररोज लाखो भाविक साईदर्शनासाठी येतात. मात्र, या सोबतच शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्या भाविकांचं प्रमाणही वाढत असल्याचं समोर आलंय.

बेपत्ता महिलेचा तीन वर्षांनी शोध, शिर्डीतून महिला गायब का होतात?

अहमदनगर : शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिर्थस्थळ असून या ठिकाणी दररोज लाखो भाविक साईदर्शनासाठी येतात. मात्र, या सोबतच शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्या भाविकांचं प्रमाणही वाढत असल्याचं समोर आलंय. यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. ज्या महिलेच्या बेपत्ता प्रकरणानंतर हे सर्व उजेडात आलं ती महिला तब्बल साडे तिन वर्षानंतर सापडलीय. महिला सापडल्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येतोय.

इंदूर येथील दिप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले होते. तसंच मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का? या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना हायकोर्टाने दिले. दिप्ती सोनी यांचे पती मनोज सोनी यांनी न्यायालयापर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. बेपत्ता झालेल्या दिप्ती सोनी इंदूर येथेच सापडल्याने मनोज यांनी समाधान व्यक्त केलय.

मध्यप्रदेशमधील इंदूरच्या दिप्ती सोनी 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दिप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 38 वर्षीय दिप्ती सोनी पती मनोज सोनी (वय 42 वर्ष) आणि मुलांसह 2017 मध्ये इंदूरहून शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आले. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. दिप्ती सोनी गुरुवारी (17 डिसेंबर) संध्याकाळी इंदूरमधील बहिणीच्या घरी परतल्याचे मनोज सोनी यांनी सांगितलं. दिप्ती सोनी या शिर्डीत चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या. त्यानंतरचे त्यांना काही आठवत नाही. मात्र, ती घरी परतली याचं समाधान असल्याचं मनोज सोनी म्हणाले.

दिप्ती सोनी सापडल्यानंतर शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्या भाविकांच्या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी केलेल्या साडे तीन वर्षाच्या शोधमोहिमेला आता यश मिळालंय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आलाय. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने पूर्ण तपासाअंतीच पोलीस यावर भाष्य करतील, असं पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.

पोलिसांनी हायकोर्टात दिलेली शिर्डीतून बेपत्ता व्यक्तींची आकडेवारी

वर्ष      बेपत्ता      तपास बाकी

2017     71       20

2018    82       13

2019    88      14

2020   38      20

हेही वाचा :

तब्बल 4 कोटींचा कर थकवणाऱ्या ‘या’ विमानतळाला ग्रामपंचायतीची नोटीस, कर भरा अन्यथा…

शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपचा झेंडा, विखे समर्थकांमुळे तीन नगरसेवकात जादू

शिर्डीत वीज कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Increasing number of missing cases in Shirdi Ahmednagar

Published On - 3:50 pm, Sat, 19 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI