AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट! मोठा इशारा, या तीन जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, पुढची 24 तास…

Maharashtra Weather Update : राज्यात सातत्याने वातावरणात बदल होताना दिसतोय. आता कडाक्याच्या थंडीनंतर भारतीय हवामान विभागाकडून थेट पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात सध्या पावसाचा अनुकूल वातावरण आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट! मोठा इशारा, या तीन जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, पुढची 24 तास...
Heavy rain
| Updated on: Nov 22, 2025 | 7:29 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारठा चांगलाच वाढलाय. पारा सातत्याने घसरताना दिसतोय. पुण्यात कडाक्याची थंडी, तापमानात घट झाल्याने पुणेकर अनुभवतायत हुडहुडी भरवणारी गुलाबी थंडी. फक्त पुणेच नाही तर राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी पडली असून उत्तरेकडून थंडगार वारे येतंय. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असून पुढील काही दिवसांमध्ये पारा अधिक घसरण्याचा अंदाज आहे. मात्र, कालपासून थंडी थोडीशी कमी झालीये. मुंबई, नागपूर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, आहिल्यानगर, गडचिरोली, गोदिंया, जळगाव, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पारा घसरत आहे. धुळ्यात 7.5 सेल्सिअसपर्यंत पारा घसरला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला.

गारठा सध्या जाणवत असला तरीही मागच्या दोन ते तीन दिवसांच्या तुलनेत काही भागात गारठा कमी झाला. हेच नाही तर ढगाळ वातावरणही बघायला मिळतंय. सध्या राज्यात पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झालंय. काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा देखील दिलाय. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

काही ठिकाणी पारा 10 अंशांच्याखाली आहे. शुक्रवारी धुळे येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 7.5 अंश इतके तापमान नोंदवले गेले. परभणी येथे 8.9 तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, आहिल्यानगर आणि महाबळेश्वर येथे पारा 11 अंशाने खाली आला. आज राज्यातील काही शहरांमध्ये पावसाला पोषक असे वातावरण आहे. हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये होईल.

पुण्यातला पारा हा 10 अंशाच्या खाली गेला. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा पसरला. थंडी वाजू नये यासाठी पुण्यातील सारसबागेतील गणपती बाप्पाला परंपरेनुसार लोकरचा स्वेटर आणि कान टोपी घालण्यात आलीयं. गणपत्ती बाप्पाला देखील थंडी वाजत असेल ही गोड भावना ठेवून हा स्वेटर गणपती बाप्पाला घालण्यात आलाय. प्रत्येक हिवाळ्यात जेंव्हा जेंव्हा थंडी वाढते तेव्हा बप्पाला स्वेटर घातला जातो.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.