AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरमध्ये मोसमातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, आज अमरावतीला रेड अलर्ट; हवामान विभागाचा इशारा काय?

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

नागपूरमध्ये मोसमातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, आज अमरावतीला रेड अलर्ट; हवामान विभागाचा इशारा काय?
Red Alert
| Updated on: May 21, 2026 | 11:26 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आज राज्यातील तब्बल 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला. अमरावतीला आज उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. आज पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अमरावतीत मागील आठवड्याभरापासून विक्रमी तापमानाची नोंद करण्यात येत आहे.  मागील पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचा पारा 46 अंशाच्या वरती जात आहे.. शनिवारी पारा 46 अंशवर गेला.. मागील चार पाच दिवसांपासून पारा 46 अंशावर पोहोचला.. काल 46.04 होता तर आज उष्णतेचा रेड अलर्ट दिल्याने आजही पारा 46 च्या वर जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे नागरिकांची गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे असं आवाहन हवामान खात्याने केला आहे. अजून काही दिवस पारा असाच राहील असं हवामान खात्याने सांगितले आहे…

नागपूर शहरात काल तापमान 46.6 अंशावर गेल असून शहरात प्रकारे उन्हाचा आगडोब पसरला. दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस कालचा ठरला. दुपारनंतर रस्ते ओस पडले कुलर पंख्यातूनही गरम हवा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले. आजही तापमान वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जाहीर केला आहे. यापूर्वी 27 मे 2024 रोजी नागपुरात 45.6 °c तापमानाची नोंद झाली होती.

मात्र, यंदाच्या मे महिन्यात उष्णतेने अधिकच भीषण रूप धारण केले आहे.  विशेष म्हणजे नागपुरातील कालचे तापमान मे महिन्यातील सर्वाधिक तापमान होते. 23 मे 2013 रोजी नागपूरत 47.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती जो आतापर्यंतचा उच्चांक मानला जातो. हवामान तज्ञांच्या मते यंदा पारा आणखी वाढून जुने विक्रम मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण झाले. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवस पारा चाळिशीवर राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज. तर 21 ते 24 मे या कालावधीत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, अशीही शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा नियंत्रणात आहे. मुंबईत अजूनही मान्सूनपूर्व सरींनी उपस्थिती लावलेली नाही.

Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?