AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी, पुढील 24 तास…

Maharashtra Weather and Rain Update : दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला. विशेष म्हणजे आतापर्यंत पावसाचा जोर बघायला मिळाला. राज्यातील काही भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र, काही भागात जोरदार पाऊस होताना दिसतोय.

मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी, पुढील 24 तास...
Rain
| Updated on: Jul 31, 2025 | 7:43 AM
Share

राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून काही भागात पाऊस ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, काही भागात पावसाने विश्रांती घेतलेली नाही. आजही भारतीय हवामान खात्याने काही भागात अलर्ट जारी केलाय. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस चांगला असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवलाय. पंढरपुरकडेही पाऊस चांगला असल्याने धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. दरवर्षापेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला. विशेष म्हणजे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी मॉन्सूनच्या पावसाचा जोर बघायला मिळाला.

भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा 

भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. विजेंच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर ठिकाणी पावसाच्या सरी मध्यम स्वरूपात कोसळतील. बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासूचन पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळाले.

विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला 

देशातील इतर भागांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस पडताना दिसला. मात्र, आता परत पाऊस कमी जास्त होताना दिसतोय. राज्यातील काही भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड या भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे.

नागपूर, अमरावती, वर्धा, गोदिंया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आज पावसाचा इशारा 

आज भारतीय हवामान विभागाने नागपूर, अमरावती, वर्धा, गोदिंया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात यंदा चांगलाच जोरदार पाऊस झाला आहे. अनेक नद्या भरून वाहत आहेत. मध्यंतरीच्या पावसाने गडचिरोलीच्या काही भागांचा संपर्क देखील तुडला होता. खडकवालसला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने लगतच्या भागांना सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस दिसतोय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.