AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

Weather update : राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. दुहेरी संकट राज्यावर आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती राज्यात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
heat wave alert
| Updated on: Apr 19, 2026 | 7:06 AM
Share

राज्यात उष्णतेने कहर केला. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. पावसाला पोषक वातावरणही आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. अमरावती आणि वर्धा येते उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 44.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. नागपूर, वाशिम, गडचिरोली येथे 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आजही उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे.

उष्णता वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले जात आहे. अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी घराबाहेर न पडणे अधिक फायदेशीर. यासोबतच उष्णघातापासून दूर राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. बुलढाणा जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान 40 डिग्री पासून 42 डिग्रीवर पोहचले आहे.  मागील महिन्यात तापमान हे 38 डिग्री पर्यंत गेले होते, मात्र एप्रिल महिन्यात तापमानाची तीव्रता वाढली आहे.

खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्षाची स्थापना केली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून सध्या तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात उष्मघात कक्ष उभारण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी या कक्षामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना वारंवार रेशन दुकानात जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेशनकार्डधारकांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी दिले जाणार आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक रेशनकार्डधारकांना या निर्णयाचा फायदा होणार असून, जिल्ह्यात तापमानाच्या पारा 42 अंश सेल्सिअसच्या गेला.

Follow Us
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी