AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला का? शिंदेंच्या सुपुत्राने इंडिया आघाडीला डिवचले, म्हणाला मोदींच्या…

देशाचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्यावर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे. राधाकृष्णन यांना ४५२ मतं मिळाली, तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला ३०० मतं मिळाली.

अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला का? शिंदेंच्या सुपुत्राने इंडिया आघाडीला डिवचले, म्हणाला मोदींच्या...
| Updated on: Sep 10, 2025 | 4:16 PM
Share

देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी (९ सप्टेंबर) रोजी मतदान पार पडलं. यावेळी देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली. यावेळी सी.पी. राधाकृष्णन यांना 452 तर विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. तर 15 मतं अवैध ठरली. त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. आता या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

श्रीकांत शिंदे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरुन विरोधकांवर टीका करत भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए (NDA)सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशीरा का होईना कळू लागलंय. देर आये दुरूस्त आये, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे ट्वीटमध्ये काय म्हणाले?

अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला का? भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा, असं आवाहन काँग्रेसचे यात्रेकरु खासदार राहुल गांधीं यांनी केलं होतं. ‘इंडि’(INDI) आघाडीच्या खासदारांनी खरोखरच त्यांचं ऐकलं! अंतरात्म्याच्या आवाजाला जागून त्यांच्यापैकीच अनेकांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत आदरणीय श्री. राधाकृष्णनजींच्याच पारड्यात टाकलं.

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए (NDA)सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशीरा का होईना कळू लागलंय. देर आये दुरूस्त आये .. भारताच्या उपराष्ट्रपतीपदी १५२ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले एनडीएचे उमेदवार आदरणीय श्री. सी. पी. राधाकृष्णनजी यांचे हार्दिक अभिनंदन आणि एनडीएला(NDA) मतदान करणाऱ्या इंडी(INDI) अलायन्सच्या खासदारांचे मनापासून धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र, असे श्रीकांत शिंदेंनी म्हटले आहे.

सी. पी राधाकृष्णन यांचा अल्पपरिचय

दरम्यान भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या गौंडर या प्रमुख ओबीसी जातीचे आहेत. त्यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संबंधित आहे. 2023 मध्ये राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर जुलै 2024 मध्ये त्यांची महाराष्ट्रात बदली करण्यात आली. त्यांच्या आधीच्या उपराष्ट्रपती धनखड यांच्या उलट, राधाकृष्णन यांनी राज्यपाल म्हणून वादग्रस्त राजकीय मुद्द्यांवर सार्वजनिकरित्या टिप्पणी करणे टाळले आहे. ते 1998 मध्ये पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून आले. यानंतर 1999 मध्ये पुन्हा याच जागेवरून ते लोकसभेवर निवडून आले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...