AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्रीवादळाचा हाय अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस, वेगाने येतंय संकट, 25 ते 27 नोव्हेंबर..

मागील काही दिवसांपासून राज्यात सातत्याने हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच राज्यासह देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यासोबतच चक्रीवादळाचा अलर्टही जारी करण्यात आला.

चक्रीवादळाचा हाय अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस, वेगाने येतंय संकट, 25 ते 27 नोव्हेंबर..
rains along with cyclone
| Updated on: Nov 25, 2025 | 9:04 AM
Share

राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतो. राज्यात थंडी कमी झाली. हेच नाही तर आता भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. गेले दोन दिवस राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा काहीसा कमी होऊन अनेक भागांत उकाडा सहन करावा लागत आहे. दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा देखील बसत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात गारठा जाणवणार नाही. याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले. याचबरोबर सध्या राज्यात पूर्वेकडून वारे वाहत आहेत. त्याचबरोबर आर्द्रताही वाढली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्याच्या तापमानात वाढ झाली असून बरोबरीने थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ही स्थिती साधारण पुढील पाच ते सात दिवस कायम राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पाऊस झाला.

त्यानंतर मागील काही दिवसांपासून थंडी वाटत होती. आता पुन्हा एकदा तापमानात बदल झाला असून उकडा जाणवत आहे. त्यामध्येच पावसाचा इशारा देण्यात आला. दरम्यान, हवामान खात्याने चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली आहे. आयएमडीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार होणारी एक नवीन हवामान प्रणाली वेगाने सक्रिय होत आहे. काही दिवसांत ती एका मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते.

या चक्रीवादळ प्रणालीमुळे, पुढील पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 28, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस पडेल. त्यामध्येच दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठे संकट आले असून वातावरणा खतरनाक झालंय. देशात वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम आता आरोग्यावरही होताना दिसत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.