राज्यावर संकट! या भागात पावसाचा इशारा, अलर्ट जारी, तब्बल तीन राज्यांसह..
Maharashtra Weather Update : जानेवारी महिन्याला सुरूवात झाली आहे. मात्र, देशातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला.

राज्यासह देशात हवामानात सातत्याने चढउतार बघायला मिळत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून धुकेही वाढले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी वाढल्या असून राज्यात पुढील काही दिवसात तापमानात चढउतार बघायला मिळेल. उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढला असला तरीही राज्यातील अनेक भागातून गारठा कमी झाला. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यापासून हवामानात बदल होताना दिसतोय. मुंबई, नवीन मुंबई आणि ठाण्यात वायू प्रदूषण हा गंभीर विषय बनला. मुंबईत सध्या वायू प्रदूषण प्रचंड वाढले असून लोकांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला. प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असून डॉक्टर नागरिकांना मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत आहेत. श्वसनाशी संबंध समस्या निर्माण होत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ होत आहे, परिणामी पुणे शहरातील थंडी वाढली आहे तर पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात राज्यात थंडीची लाट येऊ शकते. शिवाय संपूर्ण जानेवारी महिन्यात राज्यात थंडी कायम राहिले.
आजही राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली असून धुळ्यात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर, पुणे, नाशिक या भागात ढगाळ वातावरण राहिल आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात तापमानात सातत्याने चढउतार राहिल असाही भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 6 जानेवारी रोजी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाची शक्यता आहे. मंगळवारी उत्तर भारतातील पंधरा जिल्ह्यांना थंडीच्या लाटेच्या धोकादायक इशारा जारी केला असून किमान तापमानात सातत्याने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. शिवाय दिल्लीमध्येही प्रदूषणात मोठी वाढ झाली असून शाळांना शक्य असेल तर ऑनलाईन क्लास घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबईसोबतच दिल्लीतील वायू प्रदूषण गंभीर विषय बनलाय.
