AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लँडिंगवेळी इंडिगोचं विमान डगमगलं, अन्…, मुंबई विमानतळावर प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला

आज (शनिवार 16 ऑगस्ट) मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात टळला. इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान लँडिंगवेळी अनियंत्रित झालं होते. या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळले असल्याचे समोर आले आहे.

लँडिंगवेळी इंडिगोचं विमान डगमगलं, अन्..., मुंबई विमानतळावर प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला
indigo-flight 321
| Updated on: Aug 16, 2025 | 9:16 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता आज (शनिवार 16 ऑगस्ट) मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात टळला. इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान लँडिंगवेळी अनियंत्रित झालं होते. या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळले असल्याचे समोर आले आहे. मात्र यामुळे कोणताही अपघात झाला नाही, त्यामुळे विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या A321 विमानाचा मागच्या भागाने लँडिंगवेळी धावपट्टीवर आदळला. कंपनीने म्हटले की, खराब हवामानामुळे पायलटने लँडिंगऐवजी पुन्हा टेकऑफचा निर्णय घेतला, त्यामुळे विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे नुकसान टळले आहे.

नेमकं काय घडलं?

इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, “16 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत खराब हवामान होते. त्यामुळे कमी उंचीवर उड्डाण करत असताना इंडिगो एअरबस ए321 या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. मात्र विमानाने पुन्हा उड्डाण घेतले आणि ते सुरक्षितपणे उतरले. आता हे विमान पुन्हा सेवेत उतरवण्यासाठी आवश्यक तपासणी, दुरुस्ती आणि मंजुरी घ्यावी लागणार आहे.’

डीजीसीएला दिली माहिती

इंडिगोने निवेदनात म्हटलं की, ‘प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा याला इंडिगोचे प्राधान्य आहे. यामुळे आमच्या कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या घटनेनंतर विमान ग्राउंड करण्यात आले असून डीजीसीएला त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आता या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.

विमान बँकॉकहून मुंबईला येत होते

डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आम्ही या घटनेची चौकशी करू. हे विमान 6E 1060 होते, जे बँकॉकहून मुंबईला येत होते. शनिवारी पहाटे 3:06 वाजता धावपट्टी 27 वर उतरत असताना हा किरकोळ अपघात झाला. खराब हवामानामुळे ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.