AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : बापमाणूस… लेकीच्या हळदी समारंभात इंदोरीकर महाराज स्वत: … डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर

विख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या लेकी, ज्ञानेश्वरीचा विवाह आज संध्याकाळी होणार आहे. अहमदनगर येथे १०० एकर परिसरात भव्यदिव्य सोहळ्याची तयारी असून या लग्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र लग्नापूर्वी इंदोरीकर महाराजांचा एक व्हिडीओ समोर आला असून तो पाहून डोळ्यात पाणी येईल.

Indurikar Maharaj : बापमाणूस... लेकीच्या हळदी समारंभात इंदोरीकर महाराज स्वत: ... डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर
इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाची जय्यत तयारी
| Updated on: May 03, 2026 | 2:04 PM
Share

विख्यात किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर यांच्या घरी सध्या गडबडीचं पण तितकंच आनमंदाच वातावरण आहे. त्याचं खास कारण म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या लेकीचं, चि.सौ.का. ज्ञानेश्वरी हिचं आजल लग्न आहे. आज संध्याकाळी ( 3 मे) ज्ञानेश्वरी हिचा विवाह साहिल चिलप यांच्याशी होणार असून या शाही विवाहासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर येथील गुंजाळवाडी येथे दोघांचं लग्न होणार असून त्यांसाठी इंदोरीकर महाराजांचं कुटुंब आणि चिलप कुटंबीय प्रचंड उत्साही आहेत. या विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून इंदोरीकरे हेदेखील पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

शाही थाटात पार पडणार विवाह

या लग्नासाठी तब्बल १०० एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक दिग्गज राजकीय नेते, मोठी मंडळी, अशा अनेकांना या विवाहसोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्यात आलं आहे. पाहुण्यांची आणि वऱ्हाडी मंडळींची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून इंदोरीकर महाराज हे स्वत: जातीने सगळीकडे लक्ष देत आहेत. इंदोरीकर महाराजांची लेक आता चिलप कुटुंबाची सून होणार आहे.

एकीकडे इंदोरीकर महाराज हे कीर्तनातून लोकांना साधेपणाचा सल्ला देत असतात, लग्न साधेपणे कार, पैसे उडवू नका, कमी खर्च करा असा सल्ला देत असतात. मात्र त्याच इंदोरीकर महाराजांनी आधी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात आणि आता लग्नातही शाही थाट केल्याचे दिसत आहे. त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हायरल झाल्यावर इंदोरीकरांवर टीका झाली होती. पण त्यांनी टीकाकारांना भीक न घालता लग्न अजून दणक्यात करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे आजच लग्नासाठी भव्य तयारी केली असून मोठा मंडप, सजवाट,खाण्यापिण्याची रेलचेल दिसत आहे.

लेकीच्या हळदी समारंभात दिसला बापमाणूस

एकीकडे टीकाकार हे इंदोरीकर महाराजांवर टीका करत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. इंदोरीकर महाराजांबद्दल, त्यांच्या लेकीच्या लग्नाबद्दल जाणून घेण्याची लोकांनाही खूपच उत्सुकता आहे. त्यातच आता इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नापूर्वी हळदी समारंभातील एक व्हिडीओ समोर आला असून तो पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. कारण त्या व्हिडीओ इंदोरीकर हे कीर्तनकार किंवा महाराज म्हणून दिसत नसून तिथे एक पित्याचं रूप दिसतंय.

लग्नापूर्वी ज्ञानेश्वरी हिची हळद झाली. त्यानंतर जेवणाच्या वेळचा हा व्हिडीओ असून तिथे इंदोरीकर हे स्वत: पंगतीत आग्रह करून उपस्थितांना वाढताना दिसत आहेत. पांढरा शर्ट, पँट, डोक्यावर टोपी अशा नेहमीच्या वेषात असणारे इंदोरीकर हे तिथे लेकीच वडील म्हणून, वधूपिता म्हणून दिसत आहेत. लग्नासाठी आलेल्यांची खातीरदारी करत, त्यांना काही कमी पडत नाहीये ने हे बघत ते जातीने हजर आहेत. वऱ्हाडी मंडळींना ते स्वतच्या : हाताने वाढून, आग्रह करून जेवायला सांगत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या समोर आला असून बराच व्हायरल झाला आहे. वधूपिता इंदोरीकरांचं हे रूप, त्यांचा हा अंदाज पाहून अनेकांना आपल्या वडिलांची आठवण झाली असेल हे निश्चित. बापलेकीचं अतुट नातं असं म्हणत नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी