Thane Collector : संभाव्य भूस्खलनाच्या भागांची पाहणी करून आपत्ती निवारण आराखडा तयार करा, जिल्हा प्रशासनाचे निर्देश

भारत सरकारने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागास भूस्खलन होण्यामागील तांत्रिक कारणमिमांसा शोधणे व सर्वेक्षण करून अहवाल देण्याकरीता नोडल विभाग म्हणून घोषित केले आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने भूस्खलन आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात भूस्खलन आपत्ती विषयक संक्षिप्त टिपणी प्रसिद्ध केली आहे.

Thane Collector : संभाव्य भूस्खलनाच्या भागांची पाहणी करून आपत्ती निवारण आराखडा तयार करा, जिल्हा प्रशासनाचे निर्देश
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
Image Credit source: Google
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 01, 2022 | 1:08 AM

ठाणे : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा समावेश भूस्खलन (Landslide) आपत्ती भूभागात केला आहे. त्यामुळे संभाव्य भूस्खलन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज रहावे. तसेच स्थानिक प्रशासनाने भूस्खलन होऊ शकणाऱ्या गावे/क्षेत्रांची पाहणी करुन आपत्ती निवारण व्यवस्थापना (Disaster Mitigation Plan)चा आराखडा तयार करावा. क्षेत्रीय पाहणी झाल्यानंतर संभाव्य धोक्याच्या ठिकाणांबाबत स्थानिक जनतेला माहिती द्यावी. जुलै महिन्यात अतिवृष्टीची सूचना मिळाल्यानंतर संभाव्य धोक्याच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे इतर ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी योग्य जागा निवडून ठेवाव्यात, असे निर्देश (Instructions) जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

भारत सरकारने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागास भूस्खलन होण्यामागील तांत्रिक कारणमिमांसा शोधणे व सर्वेक्षण करून अहवाल देण्याकरीता नोडल विभाग म्हणून घोषित केले आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने भूस्खलन आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात भूस्खलन आपत्ती विषयक संक्षिप्त टिपणी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भूस्खलन होण्याची कारणे, भूस्खलनाची शक्यता/आगाऊ सूचना देणारी निर्देशांकाची माहिती देण्यात आली आहे. तसेच भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, याबद्दलच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व स्थानिक प्रशासनास याविषयी निर्देश दिले आहेत.

दक्ष राहून वेळोवेळी निरिक्षणे नोंदविण्यात यावी

भूस्खलनाची शक्यता आणि त्यांची आगाऊ सूचना देणारी काही निर्देशके विविध विभागांनी वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे नमूद केली आहेत. त्यामध्ये घरामध्ये अचानक पाण्याचा शिरकाव होणे, माती-मुरुमाचा राडा रोडा नाला पात्रात वाहतांना दिसणे, नितळ पाणी देणाऱ्या झऱ्यांमध्ये अचानक गढूळ पाणी येणे, घराच्या भिंतींना, जमिनीला अथवा रस्त्यावरती भेगा दिसून येणे, डोंगर उताराला तडे जाणे अथवा जमीन खचू लागणे, घरांची पडझड होणे, झाडे कलणे, विद्युत खांब कलणे तसेच झरे रुंदावणे व त्यांच्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडणे इत्यादी लक्षणांचा समावेश आहे. ही कारणे सकृतदर्शनी भूस्खलनाची सूचना देणारी असू शकतात. तसेच काही स्थानिक परिस्थितीनुसार भूस्खलनाची अतिरिक्त कारणे असू शकतात. याबाबत दक्ष राहून वेळोवेळी निरिक्षणे नोंदविण्यात यावी. जेणेकरून आपत्ती व्यवस्थापन करण्यात त्याचा उपयोग होऊ शकेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संभाव्य आपत्ती निवारणासाठी तयारी करावी

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने भूस्खलनाचा संभाव्य धोका असलेले क्षेत्र / गावे यांचा अहवाल, नकाशे व याद्या जिल्हा प्रशासनास आपत्ती निवारण व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध करुन द्यावी. या माहितीच्या आधारे स्थानिक प्रशासनाने भूस्खलन होऊ शकणाऱ्या संभाव्य गावांची पाहणी करून तेथील जनतेला या धोक्याची माहिती द्यावी. तसेच संभाव्य आपत्ती निवारणासाठी तयारी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनास दिले आहेत. (Instructions for preparation of disaster mitigation plan by inspecting areas of possible landslides)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें