AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

इस्लामपूर नगपारलिकेच्या लोकांकडून गेल्या बऱ्याच दिवसांपासून एक मागणी केली जात होती. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं जावं, असं तिथल्या लोकांचं मत होतं. आता याच मतानुसार इस्लामपूरचं नाव इश्वरपूर करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
islampur name changed to ishwarpur
| Updated on: Nov 04, 2025 | 3:27 PM
Share

Islampur City Name Changed : गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव इश्वरपूर केले जावे, अशी मागणी केली जात होती. यात भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचाही समावेश होता. दरम्यान, आता याच नामकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्लामपूर शहराचे नाव आता बदलण्यात आले आहे. यापुढे हे शहर इस्लापूर नव्हे तर इश्वरपूर म्हणून ओळखले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आलेली असताना आता राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

इस्लामपूर शहर आता झाले ईश्वरपूर

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही माहिती देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. इस्लामपूर नगपारलिकेच्या लोकांकडून गेल्या बऱ्याच दिवसांपासून एक मागणी केली जात होती. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं जावं, असं तिथल्या लोकांचं मत होतं. आता याच मतानुसार इस्लामपूरचं नाव इश्वरपूर करण्यात आलं आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने पाठवला होता केंद्राकडे प्रस्ताव

गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ सभागृहात इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहविभागाला या शहराचे नाव बदलण्यााबाबत एक प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव आता मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, अशा भावनाही यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

अधिसूचना जारी करण्यात आली, आता यापुढे…

या शहराच्या नामकरणाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता सांगलीतील शहराचं नाव इस्लामपूर नसेल. आता हे शहर ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल, असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहराचे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या नामकरणाचे परिणाम सांगली जिल्ह्यातील  निवडणुकीवर पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.