AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon| जळगाव महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेत फूट; नगररचना विभागाच्या कारभारावरून सुंदोपसुंदी

जळगाव महापालिकेत भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता मिळविली. मात्र, आता त्याच सत्तेला ग्रहण लागण्याची वेळ आली आहे.

Jalgaon| जळगाव महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेत फूट; नगररचना विभागाच्या कारभारावरून सुंदोपसुंदी
Jalgaon Municipal Corporation
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 2:24 PM
Share

जळगावः गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहणाऱ्या जळगाव महापालिकेमध्ये सत्ताधारी शिवसेनेत फूट पडल्याचे समोर येत आहे. शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आपल्याच सत्तेत असलेल्या नगररचना विभागात नागरिकांची पिळवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. जळगाव महापालिकेत भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता मिळविली. मात्र, आता त्याच सत्तेला ग्रहण लागण्याची वेळ आली आहे.

भ्रष्ट कारभार सुरू

शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापालिकेचा कारभार भ्रष्ट असल्याचा आरोप केला आहे. नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय सोशल मीडियावर जाहिरात प्रसिद्ध करून त्यांनी या भ्रष्टाचाराचे बिंग फोडले आहे. ज्यांना नगररचना विभागात काम असेल, त्यांनी आपल्याला भेटावे. कोणतीही रक्कम न देता आपण त्यांचे काम करून देवू, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी गटात फूट पडल्याचे उघड झाले आहे.

महापौरांचा इशारा

एकीकडे शहरातील समस्या सुटत नाहीत. दुसरीकडे सत्ताधारी वाद करीत आहेत. त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. महापालिकेत सत्ताधारी शिवसेना पक्षाचा मी नगरसेवक आहे. याची मला जाण आहे, परंतु नगराचनेत एक दलाल बसलेला आहे. जळगावकर जनतेसाठी मी बंड पुकारले आहे, असा आरोप नगरसेवक नाईक यांनी केला आहे. महापौर जयश्री महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, महापालिकेत सत्ताधारी शिवसेना व विरोधात असलेली भाजप विकासासाठी एकत्र आहे. मात्र, असे असताना विकासकामांमध्ये विघ्नसंतोष निर्माण करायचा. जे सुरळीत सुरू आहे, त्यात मीठाचा खडा टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. त्यांनी असे चुकीच्या पद्धतीने चुकीचे काम करू नये, असा इशाराहा दिला आहे.

11 जानेवारीला सुनावणी

दरम्यान दुसरीकडे,  भाजपच्या हातावर तुरी देऊन शिवसेनेच्या गळाला लागलेल्या 27 नगरसेवकांमुळे आता भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्या पात्रतेबाबत येत्या 11 जानेवारी रोजी नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, कोणते नगरसेवक पात्र ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

इतर बातम्याः

Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.