अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? गिरीश महाजन बघा काय म्हणाले

अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना सध्या प्रचंड उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणात सध्या कोणतीही घडामोड घडली की त्याचा थेट संबंध लावत अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा सुरु होते. या चर्चांवर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय.

अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? गिरीश महाजन बघा काय म्हणाले
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 9:54 PM

जळगाव | 22 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे नेमक्या काय घडामोड घडत आहेत? ते फार महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर गेले. शिंदे यावेळी कुटुंबासह दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिंदे काल रात्री दिल्लीच्या दिशेला रवाना झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचं ट्विट चर्चेला कारण ठरलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिटकरी यांनी शुभेच्छा देणारं ट्विट केलं होतं. यावेळी त्यांनी अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अजित पर्व सुरु होणार, असं आशयाचं ट्विट केलं होतं.

अमोल मिटकरी यांचा हेतू शुद्ध आहे. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांमधून व्यक्त केली. पण राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलं. या सगळ्या घडामोडींवर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला काही तथ्य नाही. थोडेफार अतिउत्साही कार्यकर्ते असतात. 2024 च्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत. पक्षश्रेष्ठींने थेट सांगितलं आहे. सध्या तरी मुख्यमंत्री बदलण्याचा विषय नाही. स्वतः उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं आहे की, 2024 च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला

दरम्यान, गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “राज्यात 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. “खरंतर एकनाथ खडसेंना आता दिवसा स्वप्न पडायला लागलं आहे. त्याला काही इलाज नाही. खडसेंनी पक्ष बदलला. त्यामुळे त्यांची बाजू बदलते. एकनाथ खडसे सध्या अस्वस्थ आहेत. त्याला इलाज नाही”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

गिरीश महाजन यांची नाना पटोले यांच्यावरही टीका

गिरीश महाजन यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी पटोलेंवरही टीका केली. “नाना पाटोलेंचं काय ऐकावं? त्यांचं स्वत:च्या पक्षात तरी काय स्थान आहे? ते आता वेडंवाकडं बोलणारच आहेत. कारण ते विरोधी पक्षात आहेत. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. ते थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आम्ही ज्याच्याशी दोस्ती करतो त्याची पूर्ण निभवतो. अजित पवार हे आता आमच्यात आले. त्यामुळे ही दोस्ती आता तुटणार नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.