जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील डोंगरी नदीवरील बंधाऱ्यात 4 चिमुकल्यांचा मृत्यू
जळगावमधील चाळीसगाव तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंगरी नदीच्या बंधाऱ्यामध्ये चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. चार मुलांचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने कुटूंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगरी नदीवरील बंधाऱ्यात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळ ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील या चारही भावंडांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने चिमुकलांच्या मृत्यदेहाचा शोध घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. या घटनेनंतर मोठी खळबळ परिसरात बघायला मिळतंय. संपूर्ण गावामध्ये दु:खाचे वातावरण बघायला मिळत असून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आता या प्रकरणात तपास करत आहेत.
