AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Election Result | जळगावात ठाकरे गट की, शिंदे गट सरस कोण?निकालाचा आकडा बघा

Jalgaon Election Result | ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. जळगावच्या निकालाकडे विशेष लक्ष होतं. कारण तिथे ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेल्या गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल भविष्याचे संकेत देतात. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे.

Jalgaon Election Result | जळगावात ठाकरे गट की, शिंदे गट सरस कोण?निकालाचा आकडा बघा
eknath shinde and uddhav thackeray
| Updated on: Nov 06, 2023 | 12:54 PM
Share

जळगाव (किशोर पाटील) : आज राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. निकालमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण 2359 ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. शिवसेनेत सध्या दोन गट आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट. या दोन गटात शिंदे गटाने बाजी मारली आहे. जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंत्री गुलाबराव पाटील यांचा करिष्मा कायम आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाने घवघवीत यश मिळवलय. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार जळगाव ग्रामीणमध्ये 34 पैकी 29 ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे विजय उमेदवार सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “विरोधक आहेत तरी कुठे? असा थेट सवाल करत टीका करणाऱ्या विरोधकांना आव्हान दिलं आहे”

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“जो काम करतो, जनता त्याच्याच बाजूने असते. त्याचीच फलश्रुती म्हणजे हा निकाल आहे आणि जनता आमच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट झालं आहे. आगामी निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचा हा निकाल म्हणजे आमच्यासाठी नांदी आहे. आता तरी विरोधकांना शुद्ध यावी , टीका करण्यापेक्षा काम करावं असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Follow Us
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं