संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल, आता तेवढंच…; भाजप नेत्याचा थेट हल्लाबोल

Girish Mahajan on Sanjay Raut : भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संज राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? वाचा सविस्तर...

संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल, आता तेवढंच...; भाजप नेत्याचा थेट हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 4:12 PM

संजय राऊत यांचं डोकं तपासावं लागेल. आता तेवढेच राहिलं आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी रसद पुरवली आहे. मोदी-शाहांसुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यावरून गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

लोकसभेच्या निकालावर काय म्हणाले?

येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यावर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली. घोडामैदान समोर आहे. काय आहे ते समोर येईल. जळगाव लोकसभेच्या जागेबाबत बातम्या, निराधार गोष्टी सध्या पसरत आहेत. त्यामुळे आपण चार तारखेला भेटू. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आमच्या उमेदवाराला सर्वात जास्त उच्चांकी विक्रमी मत राहतील. लिहून घ्या उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजय होतील, असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.

राज्यामध्ये सर्वात जास्त निकाल हा महायुतीच्या जागेबाबत महाराष्ट्रातून जाईल. देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत. स्पष्ट बहुमत आमचं देशामध्ये येईल. मोठ्या मतांनी आमचे खासदार देशात निवडून येतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. पूर्ण देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं ठरवला आहे. त्यानुसार तेच पंतप्रधान होतील, असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताच्या वाढत्या प्रमाणावर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिलीय. जिल्हाधिकाऱ्यांनी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा आवश्यक काम नसताना बाहेर पडू नये. जिल्ह्यात बेवारस लोकांचे मुर्तदेह आढळले आहेत. त्यात काही लोकांचा सुद्धा उष्माघातामुळेच मृत्यू झालेला असेल. कारण 47 पर्यंत तापमान पोहोचलेला आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम हा होत आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.