AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil : प्रवेश केला म्हणजे त्यांचे लफडे बंद होईल असं नाही; गुलाबराव पाटील कुणाबद्दल बोलले? आणि का?

Gulabrao Patil Big Statements : अक्षय तृतीया सणाच्या काळातच खानदेशातील राजकारण तापले आहे. अजित पवार गटाने येथे महाविकास आघाडीला खिंडार पाडले आहे. आजी-माजी मंत्री, बडे नेते अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येत आहे. त्यातच गुलाबराव पाटील यांच्या त्या वक्तव्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

Gulabrao Patil : प्रवेश केला म्हणजे त्यांचे लफडे बंद होईल असं नाही; गुलाबराव पाटील कुणाबद्दल बोलले? आणि का?
खानदेशात प्रवेशापूर्वीच शिमगाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 30, 2025 | 1:48 PM
Share

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खानदेशच्या राजकारणात बड्या घडामोडी घडल्या. उत्तर महाराष्ट्रातील वातावरण सध्या तापले आहे. महाविकास आघाडीला अजित पवार गटाने जोरदार धक्का दिला आहे. आजी-माजी मंत्री, बडे नेते अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येत आहे. त्यातच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या त्या वक्तव्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. महायुतीत त्यामुळे वादाची ठिणगी पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांचा गण

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अक्षय तृतीयानिमित्ताने राज्यभरातील जनतेला खान्देशची बोलीभाषा असलेल्या अहिराणी भाषेत गण म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी खानदेशातील आजी माजी मंत्र्यांना चांगलेच चिमटे काढले.

प्रवेश केला म्हणजे लफडे बंद होणार नाही

खानदेशात सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करत आहे. त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश इतका सुकर नव्हता. राष्ट्रवादीतूनच दोघांना मोठा विरोध झाला. पण अखेर त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाल्याचे समजते. १ौैेमत्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होईल असे नाहीये. ते कशा करता जाताहेत हे आख्या जगाला माहिती आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.

मजूर फेडरेशन मधील घोटाळा जिल्हा बँकेतून पाच कोटींचे घेतलेले कर्ज प्रकरण यामुळे ते अडचणीत आहेत. निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली आहे, त्यामुळे ते अडचणीत आहे, त्यानी जी घाण केली आहे ती साफ करण्याकरिता ते जाताहेत. अजितदादा छाती ठोक पाने म्हणतात की माणसं तपासून घेईल. फार सुंदर माणसं त्यांनी तपासून घेतले आहे त्या देवकर यांच्या सारखे, असा घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. अजितदादांना पुढच्या काळात लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता, असे सांगायला ते विसरले नाहीत.

गुलाबराव पाटील यांचा मोठा खुलासा

गुलाबराव देवकर यांनी आपण घोटाळा केला नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर आता सहा महिने का तोंड बंद होते. एकनाथ शिंदे यांना भेटायचे वेळी कुठे झोपलेले होते. माझ्याबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवकर यांचे बैठक झाली असा मोठा खुलासा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात होत असलेल्या प्रवेशावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजितदादा यांच्यावर निशाणा साधला आहे आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.