AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य देवेंद्र फडणवीसच करतात”; राष्ट्रवादीनं शिंदे-फडणवीस सरकारचं अपयश दाखवलं

शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचीही लोकप्रियता घसरली आहे.

एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य देवेंद्र फडणवीसच करतात; राष्ट्रवादीनं शिंदे-फडणवीस सरकारचं अपयश दाखवलं
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 8:29 PM
Share

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वाचून दाखवू का असं विचारत आहेत आणि त्यावर देवेंद्र फडणवीस त्यांना सांगत आहेत की, वाचून दाखवायची काय गरज नाही. या एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओवरून जोरदार वादंग माजला आहे. ज्या प्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. हे वाचून दाखवू का या प्रकरणावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ज्या अर्थी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे लिहिलेलं वाचून दाखवू का असं जर विचारत असतील तर ते किती दबावाखाली काम करत असतील अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

आमदार जयंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या त्या वाचून दाखवू का या प्रकरणावरून सवाल करताच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे हे फक्त मुखवटा आहेत, आणि राज्य देवेंद्र फडणवीसच चालवत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

जळगाव दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील यांनी ज्या प्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, शिंदे गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचं रेटिंग घसरलं असल्याचे सांगत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवणार असल्याचे सांगत शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे यांना जनतेचा किती पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आलं आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचीही लोकप्रियता घसरली असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.