AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरी यांची काँग्रेसवर सडकून टीका, पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत म्हणाले…

"काँग्रेसने 1947 पासून जी काही धोरण स्वीकारली तेव्हापासून आजपर्यंत खूप नुकसान झाले. पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्टील इंडस्ट्री एअर इंडिया इंडियन एअरलाईन्स यासारख्या क्षेत्रात पैसा गुंतवला. जी काही इन्वेस्टमेंट झाली ती सर्व त्याचवेळी वाया गेली", अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नितीन गडकरी यांची काँग्रेसवर सडकून टीका, पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत म्हणाले...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 12, 2024 | 8:52 PM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जालन्यात आज प्रचारसभा पार पडली. या सभेत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचादेखील उल्लेख केला. “ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. काँग्रेसने 1947 पासून जी काही धोरण स्वीकारली तेव्हापासून आजपर्यंत खूप नुकसान झाले. पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्टील इंडस्ट्री एअर इंडिया इंडियन एअरलाईन्स यासारख्या क्षेत्रात पैसा गुंतवला. जी काही इन्वेस्टमेंट झाली ती सर्व त्याचवेळी वाया गेली. पण माझं म्हणणं असं आहे की, त्याचवेळी रस्ते बनवण्यासाठी पैसा खर्च झाला असता, शेतकऱ्यांना सिंचनासाठी खर्च झाला असता, शाळा बांधण्यासाठी झाला असता, दवाखाने बांधण्यासाठी झाला असता तर कदाचित या देशाचे चित्र आज दुसरं राहिला असतं”, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली.

“काँग्रेस पक्षाने गरीबी हटावचा नारा दिला. पण कोणाची गरीबी हटली? शेतकऱ्यांची गरिबी हटली नाही. कामगारांची गरीब हटली नाही. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षातील नेत्यांची गरिबी हटली, असा हल्लाबोल नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेस बदलत गेली. पण काँग्रेस देशाचा विकास करू शकली नाही. मागील दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात आम्ही जे काम केले होते ते काँग्रेस 60 वर्षात करू शकले नाही”, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली.

‘जो करेगा जात की बात उसको खसके मारेंगे लात’

“मी सिंचन खात्याचा मंत्री असताना मी प्राधान्याने सांगू शकतो की,12 हजार कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले. विकासासाठी दिले. आपला शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे आणि इंधनदाता झाला पाहिजे. माणूस कधी जात, धर्म, पंथाने मोठा होत नाही. माणूस आपल्या गुणांनी मोठा होतो. जो करेगी जात की बात उसको खसके मारेंगे लात”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“योग्य नेता आणि नीती आली की तुमचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमची गरीबी हटल्याशिवाय राहणार नाही. आज निवडणुकीमध्ये खोटा प्रचार केला की भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर बाबासाहेबांचे संविधान बदलणार. मात्र घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. कोणत्याही पक्षाचा सरकार आला आणि कोणीही पंतप्रधान झाला तर मूलभूत तत्व बदलता येत नाही”, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

गडकरींची आणीबाणीवर टीका

“1975 मध्ये आणीबाणी आली आणि आणीबाणी यायच्या आधी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला तेव्हा त्यांनी आणीबाणी आणली. आणि भारतीय संविधानामध्ये काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांचे संविधान पूर्ण तोडून मोडून दुरुस्त केलं. ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. ज्यावेळी आणीबाणी लावली त्यावेळी आणि त्याच्या आधी घटनेचा धाज्जीया उडवण्याचं काम तुम्ही केलं. त्यावर आधी राहुल गांधी यांनी उत्तर द्यावं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“आम्ही संविधान बदलणार नाही. मात्र कोणाला बदलवू सुद्धा देणार नाही. मुसलमानांना सांगितलं की, हे भाजपवाले खूप खतरनाक आहेत. हे निवडून आले तर पाकिस्तानमध्ये पाठवून देईल. पण काँग्रेसने मुसलमानांना काय दिलं? चहाची टपरी, पानपट्टी याच्याशिवाय काही दिलेच नाही. राजकारणामध्ये जात, धर्म कोणता आणि संप्रदाय याचा उपयोग करून लोकांना आपापसात भांडण लावण्याचे काम आम्ही केलं नाही. येणाऱ्या काळात देखील या देशाकरिता समृद्ध आणि संपन्न बनवायचा आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“पुढील पाच वर्षांमध्ये जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनवायची आहे. स्मार्ट सिटी नाहीतर स्मार्ट व्हिलेज सुद्धा आपल्याला बनवायचे आहे. आज भारत सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचे इंजिन मागून लागलं तर महाराष्ट्राच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा तीन पटीने जास्त वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही”, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी